निलगाईंचा बंदोबस्त करा

0

जळगाव । तालुक्यातील नशिराबाद, बेळी, निमगाव, भागपूर, कंडारी उमाळे, कुसुंबा, जामनेर तालुक्यातील नेरी, गाडेगाव व इतर गावांना तसेच भुसावळ तालुक्यातील सुनसगाव, बेलव्हाळ, वराडसिम, गोजोरे, गोंभी, कुर्हा(पानाचे) मांडवे दिगर, शिंदी, सुरवाडे, खंडाळा, मोंढाळा आदी गावांच्या शेती शिवारात निलगाईंच्या (लोधळ्यांच्या) मुक्त संचारामुळे शेतकर्यांचे प्रचंड नुकसान होत असून शेतकरी लागवडीपासून कापणीपर्यंतच्या सर्व खर्च केल्यावर पिक हाती येण्याच्या आधी निलगाई म्हणेच पिकांना नष्ट करीत आहे.यामुळे शेतकर्‍याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या प्रकरणात लक्ष घालून तत्काळ समस्या सोडवावी अशी मागणी राष्ट्रवादी व शेतकर्‍याच्या वतीने करण्यात आली आहे.

शेतकर्‍यांसाठी धोक्याची घंटा
शेतकर्‍यांला अनेक नुकसानाला सामोरे जावे लागत आहे. आस्मानी सुलतानी संकटाला सामोरे जाताना पिक हाती काही येत नाही. पर्यायाने शेतकरी कर्जबाजारी होवू लागला आहे. आत्महत्या शिवाय पर्याय नसल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. निलगाईंचा (लोधळ्यांचा) शेती शिवारातील मुक्त संचार शेतकर्यांसाठी धोक्याची घंटा होवून बसला आहे. दिवसभर शेतात राबून रात्री शेतकर्याला पिके राखण्यासाठी शेतात जावे लागत आहे. यामुळे शेतकर्‍याचा कोणताही फायदा होत नाही. तर त्याचे जागरणामुळे शाररीक नुकसान होत असून घरामधील चैतन्याचे वातावरण हरवत चालले आहे.

अधिकार्‍याना सांगून देखील दुर्लक्ष
गेल्या 8 ते 10 वर्षापासून लोधळ्यांचा त्रासामुळे परिसरातील बर्याच शेतकर्यांनी त्यांच्या शेत जमिनी पडीत सोडलेल्या आहेत. वारंवार वन अधिकार्यांच्या निदर्शनास आणल्यावर देखील ठोस उपाय अद्याप पर्यत केला गेला नाही. शेतकरी हवालदिल झालेला असून शेतकर्यांवर उपासमारीची वेळ येवून ठेपली आहे. यासर्व समस्या लक्षात घेवून परिसरातील सर्वशेतकर्‍यानी एकत्र येऊन जिल्हाधिकारी निंबाळकर यांना निवेदन दिले. निवेदनात केलेल्या मागण्या मान्य झाल्यास शिवाय परिसरातील शेतकर्‍याला जगणे महाग आहे. अधिकार्‍यांना नेहमी शेतकरी तक्रारी करुन देखील दखल घेतली जात नाही. शेती वाचली तर शेतकरी वाचेल म्हणून या लोधळ्यांच्या संदर्भात मागण्या मान्य करण्यात याव्यात. अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.

मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन
शेतकर्‍याच्या मागण्या मान्य न झाल्यास पुढील 15 दिवसांत आंदोलन तीव्र करण्याचा ईशारा देण्यात्व आला आहे. तसेच 20 जून 2017 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. शेतकर्‍याच्या भावनाचा आदर करण्याचे निवेद्नात म्हटले आहे.यावेळी माजी मंत्री गुलाबराव देवकर, पंकज महाजन, माधव पाटील, गणपत पाटील, साण्डू पहेलवान, सैय्यद नजीर अली, वाल्मिक पाटील, गिरीश पाचपांडे, निलेश रोटे, सुभाष आर.पाटील, अरुण मराठे, चारुदत्त जंगले, विनोद रंधे, चंदक्रांत पाटील, पंढरीनाथ मराठे, चंद्रकांत भोळे, मिठाराम नारखेडे, रविंद्र चौधरी, विलास चौधरी, अशोक सुर्वे, वामन चौधरी, श्रीधर झोपे, किरण चौधरी, पुरुषोत्तम बोंडे आदी सहभागी झाले होते.

या आहेत आंदोलकांच्या मागण्या
भागपूर शिवारातील वन विभागाला संपूर्ण कुंपण करावे व सर्व निलगाईंना भागपूर वन क्षेत्रात स्थलांतरीत करावे.
शिवारातील पूर्ण लोधळ्यांना पकडून शासनाने जाहीर केलेल्या व्याघ्र प्रकल्पात व अन्य वनविभागात सोडण्यात यावे.
सर्व लोधळ्यांच्या उत्पती थांबविण्यासाठी नर लोधळ्यांचे निर्बिजीकरण करणे.
शेतकर्‍यास लोधळ्यांना मारण्याची परवानगी मिळावी व सर्व लोधळ्यांना प्रशासनातर्फे मारण्यात यावे.
शेती शिवार उध्वस्त करणार्‍या लोधळ्यांना उपद्रवी प्राणी म्हणून शासन स्तरावरुन घोषीत करण्यात यावे.
शेतकर्‍यांना या भागात असलेल्या विविध समस्यांचे निराकरण करण्यात यावे.