मुंबई । मुंबई जिल्हा कॅरम संघटना आणि मध्य रेल्वे इन्स्टिटयूट माटुंगा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या दशरथ येवले स्मृती 27 व्या सब जुनिअर आणि जुनिअर मुंबई जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेच्या 12 वर्षाखालील ( कॅडेट मुले ) गटात अंतिम सामन्यात ए के फाऊंडेशनच्या नीलांश चिपळूणकरने ए के फांऊडेशनच्याच अनिरुद्ध चव्हाणला 25-13,25-0 असे हरवून विजेतेपद मिळविले.
मुलांच्या सब जुनिअर ( 18 वर्षांखालील ) गटाच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्र कामगार मंडळ नायगावच्या ओजस जाधवने त्याच्याच क्लबच्या सुजल गायकवाडला 7-15,11-8,16-6 असे रंगतदार लढतीत पराभूत केले. 18 वर्षांखालील मुलांच्या जुनिअर गटामध्ये बँक ऑफ इंडियाच्या सिद्धांत वाडवलकरने महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ नायगावच्या रीतिकेश वाल्मिकीला अंतिम सामन्यात 19-5, 25-0 असे सहज हरवून विजय मिळावीला. तर युथ मुले ( 21 वर्षांखालील ) अंतिम सामन्यात मुंबई महानगपालिकेच्या गिरीश तांबेने प्रतिस्पर्धी एस एस ग्रुपच्या अभिषेक भरतीला अतिश चुरशीच्या लढतीत 10-15 असा पहिला सेट गमाविल्यानंतर 25-8,25-15 असे नमवून विजेतेपद पटकावले.