निलेश भिलच्या शोधात पोलीस पथक रवाना

0

मुक्ताईनगर। राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कारप्राप्त निलेश भिल व त्याचा लहान भाऊ गणपत भिल यांचे अपहरण झाल्याचे वृत्त सर्वत्र प्रकाशित होताच पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली असून त्यांच्या शोधार्थ पथक नियुक्त करुन रवाना करण्यात आले आहे. यासंदर्भात त्यांची आई सुनंदाबाई भिल यांनी मुक्ताईनगर पोलीस स्थानकात फिर्याद दिली. तालुक्यातील काही सामाजिक कार्यकर्तेही सहकार्य करीत आहेत.

अपहरण झाले की निघून गेले?
याबाबत त्यांच्या नातेेवाईकांकडून माहिती घेतली असता कोणत्याच प्रकारचे भांंडण किंवा वाद झालेला नसल्याचे सांगण्यात आले. परंतु ही दोन्ही मुले घरातून का निघून गेली, याबाबत अनभिज्ञ आहे. त्यांचे अपहरण झाले का ते स्वतःच घरातून निघून गेले याबाबत मात्र तर्कवितर्क लढविले जात आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वंदना सोनोने व हेडकॉन्स्टेबल भावसार हे करीत असून गेल्या दोन दिवसांपासून दोघांचा तपास लागलेला नाही. पोलीस सुत्रांनुसार मिळालेल्या माहितीवरुन दोन्ही मुलांच्या शोधार्थ सर्वत्र पोेलीस पथक रवाना केले असल्याचे सांगण्यात आले.
सर्व शक्यता पाहून तपास
असून राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कारप्राप्त निलेश भिल (वय 12) व त्याचा लहान भाऊ गणपत भिल (वय 7) हे 17 मे रोजी सायंकाळी 5 ते 18 मे च्या सकाळी 10 वाजेदरम्यान त्यांच्या राहत्या घरातून कोथळी शिवारातील प्रल्हाद जंगले यांच्या खदानीजवळील वस्तीतील राहत्या घरातून कोणालाही न सांगता निघून गेले. निलेश व गणपतच्या मित्र आणि मित्रांच्या पालकांकडूनही माहिती मिळविण्याचा प्रयत्न पोलिसांनी आज केला.