भुसावळ- नाशिकमधील प.सा.नाट्यगृहात झालेल्या राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्राचे युवा क्रीडा मार्गदर्शक निलेश राणे यांची क्रीडा विभागातून एकमेव महाराष्ट्रातील मानाचा कर्मवीर निवृत्तीदादा बर्वे जीवनगौरव या पुरस्कारासाठी निवड झाल्यानंतर सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील व सरसेनापती आकाशराजे कंक यांच्याहस्ते गौरव करण्यात आला. प्रसंगी शिवसेना उपनेते व माजी मंत्री बबनराव घोलप, माजी मंत्री विनायक पाटील आणि खासदार हेमंत गोडसे, शंकरराव बर्वे तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.