तळोदा (मनोज माळी)। अ वघ्या दोन महिन्यावर येऊन ठेपलेल्या पालिका निवडणुकीसाठी राजकिय हालचाली गतिमान होऊ लागल्या आहेत, महाराष्ट्रातील सर्वात जुनी असलेल्या तळोदा नगर पालीका निवडणुकीसाठी पडघम वाजायला लागले असून हौश्या नौश्या इच्छुकांनी गुडघ्याला बासिंग बांधले आहे. या निवडणूकीत नगराध्यक्ष थेट जनते तून निवडला जाणार आहे. यामुळे विजयाचे गणित बसविण्यात सर्वच राजकीय पक्ष व्यस्त आहेत. थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्यात येतो तेव्हा, भाजप उमेदवार निवडून आले आहेत, हे दोन वेळेस सिद्ध झाले आहे. यामुळे भाजप पदाधिकारी मोठया उत्साहात आहेत. उमेदवारी मिळविण्यासाठी काहींनी आतापासून जनतेशी संवाद साधण्यासाठी सोशल मिडीयाचा वापर करून जास्तीत पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहे. नगरपालिका निवडणुकीसाठी आपली सर्व शक्तीपणाला लावून कुठल्याही परिस्थितीत आपला नगराध्यक्ष निवडून आणण्यासाठी काँग्रेसचे नेते प्रयत्नशील असून त्या हालचाली सुरू करून शहरातील प्रत्येक भागात जावून तेथील समस्या जाणून त्या सोडविण्याचा प्रयत्न करीत आहे.
सध्या कॉग्रेसची सत्ता
सध्या तळोदा नगरपालिका ही कॉग्रसच्या ताब्यात आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत भाजप-सेना व राष्ट्रवादी व कॉगे्रस अशी तिंरगी लढत होती. यात कॉग्रेसने एक तर्फी बाजीमारून 17 जागापैकी 11 जागा जिंकून पालीकेवर सत्ता स्थापन केली, तर भाजप 4 जागा जिंकून दुसर्यास्थानी होता तर शिवसेना 2 जागा जिकून तिसर्या क्रमांकावर होती, राष्ट्रवादी कॉगे्रस आपले खाते देखील उघडू शकली नाहीत. यावेळी राष्ट्रवादी निवडणूकीत काय भूमिका घेते हे देखील पहाणे महत्वाचे आहे. तळोदा नगरपालीका निवडणुकीत जातीय फॅक्टर देखील महत्वाची भूमिका बजावत असते. सर्वात जास्त मतदार अनूसुचीत जमातीचे असून त्या खालोखालर माळी समाजाचे मतदार आहे. यात विशेष म्हणजे या समाजाचे 90 टक्के मतदान होते. भरत माळी यांची समाजावर चांगली पकड आहे. त्यामुळे कॉग्रेसकडून भरत माळी व संजय माळी हे उमेदवारी करतील किंवा त्यांच्या कुंटूबा तील उमेदवार राहील यात शंका नाही.
नगराध्यक्षासाठी अनेकांची तयारी
आमदार उदेसिंग पाडवी यांच्या मार्गदशनाखाली व सुरेश माळी यांच्या नेतृत्वाखाली सन2006-07 च्या पालीका निवडणुकीत भरत माळी यांचा पराभव करून पालीकेत भाजपाची सत्ता प्रस्तापित केली होती. परत हेच समीकरण आमदार पाडवी यांनी अंमलात आणले तर भाजपाला तळोदा नगरपालीकेवर सत्ता प्रस्तापीत करण्यायापासून कोणीच रोखूं शकत नाही. कारण त्यावेळी देरवील थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडला गेला होता. त्यावेळी श्रीमती विमलताई सोनवणे यांना मतदार ओळखत नसताना केवळ सुरेश माळीची पालीकेतील भूमिका यामुळे त्या विजयी झाल्या व आ उदेसिंग पाडवी यांच्या मार्गदर्शनाने केवळ 4 जागावर भरत माळीचे उमेदवार विजयी झालेत. यामुळे आमदार उदेसिंग पाडवी यांची काय भूमिका असेल, यावर पुढील राजकीय हालचाली ठरणार आहेत.
भाजपच्या तिकीटासाठी इच्छूकांची गर्दी
भाजपकडून डॉ. शशिकांत वाणी, अजय परदेशी, हेमलाल मगरे, सुरेश माळी इच्छूक असल्याचे समजते. यात डॉ. शशिकांत उमेदवारी मिळविण्यात बाजू मारू शकतील, कारण त्यांचा वरिष्ठ नेत्याशी चांगला संबध आहे. तसेच आर्थिकदृष्या सक्षम असल्याने त्याची जमेची बाजू आहे. परंतू शहरातील राजकारण पाहता वाणी यांना निवडून येण्यासाठी खूप परीश्रम घ्यावे लागणार आहे. कारण भरत माळी यांच्या दुर्लक्षामुळे त्यांच्या पत्नी सुनिता वाणी नगरसेविका म्हणून निवडून आल्यात हे नाकारून चालणार नाही.