निवडणुकीत एकदिलाने काम करावे!

0

जळगाव । केंद्रीय संरक्षण राजमंत्री ना. डॉ. सुभाष भामरे यांची जळगाव भाजपा कार्यालयात भेट दिल्यानंतर आज पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी मार्गदर्शन केले. यावेळी भाजपा जळगाव महानगरातर्फे ना. भामरे यांचे फटाके फोडून स्वागत करण्यात आले. त्यानंतर महिला आघाडीतर्फे त्यांचे औक्षण करण्यात आले. यावेळी आमदार राजूमामा भोळे, आमदार चंदूलाल पटेल, दिपक सुर्यवंशी, विशाल त्रिपाठी, दिपक फालक, महिला आघाडीच्या जयश्री पाटील, पदवीधर मतदार संघाचे उमेदवार डॉ. प्रशांत पाटील, तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसवेक, नगरसेविका आदींची उपस्थिती होती. दरम्यान आज त्यांनी भाजपा कार्यालयानंतर केशवस्मृति प्रतिष्ठान, जळगाव पिपल्स बँक, जिल्हा वकिल संघ, नुतन मराठा महाविद्यालय आणि सागर पार्क येथे सुरू असलेल्या कार्यक्रमास भेट दिली.

विधानपरीषदेचा सदस्यही महत्त्वाचा
मार्गदर्शन करतांना ना. भामरे म्हणाले की, गेल्या विधान परीषदेत भाजपाला चांगल्या पद्धतीने मतदारांनी प्रतिसाद दिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाने आज देशात आपली सत्ता आहे. त्याचप्रमाणे राज्यात आणि जळगाव जिल्ह्यातील भाजपाचीच सत्ता आहे. त्याप्रमाणे ज्यावेळी आपल्याकडे सत्ता नव्हती त्यावेळीसुद्धा जळगाव जिल्ह्यात भाजपाचा दबदबा चांगल्या पद्धतीने होता. जळगाव जिल्ह्याला माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन यांचे खंबीर नेतृत्व लाभले आहे. या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करत आहे. पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत गेल्या काही वर्षापासून ही जागा आपल्या पदरात नव्हती. जिल्हा परीषद, पंचायत समिती यांच्या निवडणूका जरा वेगळ्या आहेत. परंतू महत्त्व तेवढेच आहे. विधानपरीषदेचा एक एक सदस्य जेवढा महत्त्वाचा आहे जेवढा विधानसभेचा सदस्याचा आहे. जनकल्याणासाठी एखादे विधायक पास करायचे असेल तर दोघांची सहमती घेणे आवश्यक असते. यासाठी दोन्ही संसदेत आपल्याच पक्षाचा माणूस असणे गरजेचे आहे. त्यामुळे अनेक प्रस्ताविक कामे मंजूरीसाठी पडलेले पुर्ण होतील. कार्यकर्त्यांनी आपण दिलेल्या उमेदवाराला चांगल्या मताने निवडून आणण्यासाठी एकदिलाने काम करावे. कार्यकर्त्यांनी नेत्याचे स्वप्न व पक्षाचा अजेंडा घेवून काम करावे. निवडणूकात मतदारापर्यंत पोहचण्याची खरी जबाबदारी कार्यकर्त्याची आहे. मोदी सरकारच्या काळात सर्जिकल स्ट्राइक व फायनान्सीयल स्ट्राईक करण्यात आल्यामुळे देशात परीवर्तन असून भाजपाचे खंबीर नेतृत्व ठेवण्यासाठी सहयोग देणे गरज व्यक्त केली.

भाजपा कार्यालयात यांची होती उपस्थिती
याप्रसंगी जिल्हा पदाधिकारी विशाल त्रिपाठी दीपक सूर्यवंशी, महेश जोशी, बापू ठाकरे, नितीन इंगळे, राजू घुगे, सरिता नेरकर, वंदना पाटील, कविता सपकाळे, उज्वला बेंडाळे, महिला आघाडी जयश्री पाटील पाटील, मनोज भांडारकर, नितीन गायकवाड, संजय शिंदे, रेखा पाटील, ज्योती राजपूत, रेखा कुलकर्णी, नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे, प्रदेश केमिस्ट उपाध्यक्ष किशोर भंडारी, साकीरभाई मंडल अध्यक्ष प्रा.जीवन अत्तरदे, राजू मराठे, धीरज सोनवणे, विनोद मराठे, प्रदीप रोटे, महेश ठाकुर, राहुल वाघ, आघाडी अध्यक्ष अशोक राठी, निशिकांत मंडोरा, प्रभाकर तायडे, ज्योती निंभोरे, केशव नारखेडे, महेंद्र पाटील, प्रा.भगतसिंह पाटील,युवा अध्यक्ष जितेंद्र मराठे, दत्तात्रय जाधव, किशेार चौधरी, शिवाजी जाधव, संजय तायडे, महेंद्र केळकर, हेमंत शर्मा, राजेंद्र पाटील, हेमंत देवरे, जयंत चव्हाण, जितेंद्र चौबे, राहूल पाटील, योगेश बागडे, भूपेश कुलकर्णी, कृष्णा नेमाडे, राहूल पाटील, प्रभाकर कोल्हे, भोलानाथ परदेशी, योगेश पाटील, नाना पाटील, सुनिल जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीेच सूत्रसंचालन संघटन सरचिटणीस विशाल त्रिपाठी यांनी केले. आभार सरचिटणीस महेश जोशी यांनी मानले.

नूतन मराठा महाविद्यालयात झाला सत्कार
शहरातील नूतन मराठा विद्यालया केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्यासह आमदार भोळे, आमदार पटेल, पदवीधर संघाचे उमेदवार डॉ. प्रशांत पाटील यांचा मराठा प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा नगरसेवक नरेंद्र पाटील, अ‍ॅड.पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आले. यावेळी संचालक मंडळातर्फे जवानाला सोडविण्यासाठी जो पाठपूरावा करून सुटका केली याबाबत आभार व्यक्त केले.

जिल्हा वकिल संघाला भेट
केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी जिल्हा वकिल संघाला भेट दिली. याप्रसंगी जिल्हा वकिल संघातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पदवीधर मतदार संघाचे उमेदवार डॉ. प्रशांत पाटील यांनी निवडून देण्याचे आवाहन केले. याप्रसंगी आमदार सुरेश भोळे हेदेखील उपस्थित होते.

भाजप केमिस्ट महासंघातर्फे स्वागत
जळगाव- भाजप केमिस्ट महासंघाच्या पदाधिकार्‍यांतर्फे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांची जळगावात भेट घेण्यात येऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या भेटीत केमिस्ट महासंघाच्या पदाधिकार्‍यांतर्फे केमिस्टांच्या अडीअडचणी तसेच औषधी व्यवसायासंबंधी आलेल्या नवीन कायद्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. नवीन कायद्यामुळे केमिस्ट बांधवांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कायद्यासंबंधी चर्चा व्हावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी डॉ. भामरे यांनी केमिस्ट महासंघाच्या पदाधिकार्‍यांना पुढील चर्चेसाठी बोलविले आहे. या प्रसंगी भाजप केमिस्ट महासंघाचे प्रदेश अध्यक्ष किशोर भंडारी, निशिकांत मंडोरा, शाकीर चित्तलवाला, प्रभाकर कोल्हे आदींची उपस्थिती होती.

जळगाव पीपल्स बँकेला दिली भेट
जळगाव । दि जळगाव पीपल्स को-ऑप बँकेच्या मुख्य कार्यालयास व मुख्य शाखेस, केंद्रीय संरक्षण राज्य मंत्री माननीय डॉ. सुभाषजी भामरे यांनी सोमवारी सदिच्छा भेट दिली. बँकेच्या संचालक मंडळाशी संवाद साधला असता. नागरी बँकिंग क्षेत्रात सातत्याने चांगले काम करणारी ही बँक असल्याचा उल्लेख केला. आमदार राजुमामा भोळे, चंदुभाई पटेल, प्रशांत पाटील यांचा बँकेतर्फे सत्कार करण्यात आला. सदर प्रसंगी बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील, व्हा.चेअरमन डॉ.प्रकाश कोठारी, संचालक डॉ.सी.बी.चौधरी, दादा नेवे, सुनिल पाटील, राजेश परमार, चंदन अत्तरदे, एमडी अ‍ॅड.सीइओ अनिल पाटकर, दिलीप देशमुख आदी उपस्थित होते.

आगमनानंतर कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष
केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना. सुभाष भामरे यांच्या प्रयत्नामुळे खानदेश पुत्र भारतीय सैनिक चंदू चव्हाण यांची पाकिस्तानतर्फे सुखरूप सुटका करून आणल्याबद्दल भाजप कार्यालय येथे मिठाई वाटून आनंद व्यक्त केला. तसेच माननीय भामरे यांना धन्यवाद दिले. यावेळी आमदार राजूमामा भोळे व आमदार चंदूभाई पटेल यांच्या उपस्थिती आनंदोत्सव साजरा करण्यात आला.