मुंबई ।निवडणुका कशा जिंकायच्या ते आता मला कळले आहे. त्यामुळे निवडणुकीत आता लागतं ते मी पुरवणार, असे प्रतिपादन मनसेचे नेते राज ठाकरे यांनी गुरूवारी केले. मनसेच्या 11 व्या वर्धापन दिनानिमित्त आज त्यांनी आपले मौन सोडले. निवडणूक निकालानंतर प्रथमच ते मनसैनिकांसमोर आले.
निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा माझी पहिली प्रतिक्रिया होती की, ‘ पैसा जिंकला, काम हरलं’. इव्हीएम मशीन बाबत ज्या गोष्टी कानावर आल्या त्या जर खर्या असतील तर ते फार भयाणक आहे, असे ते म्हणाले. या निवडणुकीने एक गोष्ट राज ठाकरेंना शिकवली, काम करून फायदा नाही, असे ते यावेळी म्हणाले. निवडणुका कशा जिंकल्या जातात ते आता माझ्या लक्षात आले आहे, असे ते म्हणाले. वादग्रस्त विधआनावरून चर्चेत आलेल्या भाजपच्या निलंबीत आमदार परीचारक यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले की, अशा लोकांना चौका चौकात फोडून काढले पाहिजे. कार्यकर्त्यांना उभारी देताना त्यांनी ‘यापुढे मनसेचा निवडणुकीत पराभव नाही’, असा विश्वासाचा शब्द दिला. तो देताना त्यांनी मी आणि सारे नेते तुमच्या भेटीला येणार आहेत, तुम्ही भेटीला येण्याची गरज नाही, असे ते म्हणाले.