मुक्ताईनगर (नितीन कासार) : आगामी निवडणुकांचा बिगुल वाजल्यानंतर राष्ट्रवादीसह शिवसेना पक्षाकडून तालुक्यात श्रेयवादाची लढाई सुरू असल्याचे दिसून येते. सध्या जिल्हा परीषद व पंचायत समितीची निवडणूक जस-जशी जवळ येत आहे तस-तसे राजकीय वातावरणही पेटताना दिसून येते.
विकासकामांवरून श्रेयवाद
मुक्ताईनगर तालुक्यातील ओझरखेडा धरणात पाणी सोडण्यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी जलआंदोलन केले होते. त्यावेळी प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांनी भेट दिली व आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुखमंत्री यांच्याशी बोलणे करून ओझरखेडा धरणात पाणी सोडण्याचा प्रयत्न केला तर जिल्हा बँक अध्यक्षा अॅड.रोहिणी खडसे यांनी थेट जलसंपदा मंत्र्यांची भेट घेत बैठक जावून जलप्रकल्पांना निधीची मागणी केली व त्यानंतर खडसेंच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ओझरखेडा धरणात पाणी सोडण्यात आले व जलपूजन करून माजी मंत्री एकनाथराव खडसे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांनी काम मार्गी लावल्याचे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले.त्यानंतर कुर्हा येथील आश्रमशाळेत कोविड सेंटर सुरू करण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये जोरदार बॅनरबाजी झाली तर कुर्हा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निधीतून रुग्णवाहिका दिल्याचे सांगण्यात आले व शिवसैनिकांनी त्या रुग्णवाहिकेचे पूजन केल्यानंतर दुसर्याच दिवशी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी त्याच रुग्णवाहिकेचे पूजन करीत ही रुग्णवाहिका माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या पाठपुराव्यानंतर प्राप्त झाल्याचा दाव ाकेला. गत आठवड्यात शिवसेनेच्या वतीने कुर्हा परीसरातील धनगर वाड्यावर जनावरांना तोंड व लाळ खुरी आजार आल्यानंतर आमदार चंद्रकांत पाटील यांनी लसीचे डोस उपलब्ध करून दिले तर राष्ट्रवादीने पंचायत समिती सभापती विकास पाटील आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते यांनी गुरांना लस देण्यासाठी कुर्हा पशुवैद्यकीय दवाखान्यात आणते. भाजपाच्या माजी सभापती विद्या विनोद पाटील व भाजपचे कार्यकर्त्यांनी पुन्हा गुरांसाठी मोफस लस उपलब्ध करून दिली.
श्रेय वादाच्या लढाईत या समस्या दुर्लक्षीत
मुक्ताईनगर तालुका परीसरातील रस्ते, पाणीख गटारी अशी एक ना अनेक प्रश्न या असताना श्रेयवादाच्या लढाईत हे प्रश्न सुटणार कधी? असा प्रश्न आता सुज्ञ जनता विचारत आहे. दुसरीकडे मुक्ताईनगर तालुक्यात प्रहार संघटनेचे डॉ.विवेक सोनवणे हे विविध मागण्यांसाठी तहसीलदार व जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देवून शेतकर्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहेत शिवाय या माध्यमातून आंदोलनाचा इशाराही दिला जात आहे.