निवडणुकीपूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षकांची उचलबांगडी होणार?

0

मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठविल्याचे खात्रिलायक वृत्त
पंतप्रधानांच्या चोरुन चित्रीकरणाचा ठपका ठेवल्याचीही चर्चा
कर्मचार्‍यांमध्ये दिवसभर गुर्‍हाळ 
जळगाव (किशोर पाटील)- जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या बदलीची देान दिवसांपासून जिल्ह्यात एकच चर्चा सुरु आहे. अवैध धंद्याच्या विरोधात असलेल्या शिंदे यांची बदली करावी, यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिधींनीच मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठविल्याचे खात्रिलायक वृत्त आहे. तर दुसरीकडे एका राजकीय पुढार्‍याच्या शहरातील फार्म हाऊसवरील रंगेलेले पार्टी प्रकरण व पंतप्रधानांचे चोरुन झालेले चित्रीकरणाच्या प्रकरणाचा ठपका ठेवला जावून त्यांच्या बदलीची शक्यता सूत्रांकडून वर्तविण्यात येत आहे.

शिस्तप्रिय असलेल्या जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांची एन्ट्रीच धमाकेदार राहिली आहे. स्वतः कर्मचार्‍यांनी नियम पाळावेत त्यानंतर जनतेला आवाहन करता येईल म्हणून प्रत्येक पोलिसाला हेल्मेटची सक्ती केली. नियम न पाळणार्‍याकडून दंडही वसुल केला. विशेष म्हणजे पोलीस अधीक्षक कार्यालयात ये-जा करणार्‍या दुचाकीस्वार प्रत्येकाला हेल्मेट सक्तीचे करण्यात आले. यानंतर त्यांनी अवैधधंद्याविरोधात कारवाईची जोरदार मोहिम उघडली. यात त्यांनी कुणाचीही गय न करता प्रतिष्ठित पुढारी असो की सामान्य नागरिक प्रत्येकाला कारवाईचा दंडुका दाखविला. जिल्ह्यात एकाचवेळी सर्व नदीपात्रांमध्ये अवैध वाळूविरोधात कारवाईसाठी मध्यरात्री संपूर्ण पोलीस उतरविण्याचा इतिहासही त्यांनी केला. फरार आरोपींसाठी कोंबींग ऑपरेशन राबविले.

निवडणुकीपूर्वीच का होणार बदली ?
जिल्ह्यात अवैधधंद्यांमधून मोठ्याप्रमाणावर पैशांची उलाढाल होते. याच अवैधंदे व्यावसायिकांचा निवडणुकीत पैसा पुरविण्यासाठी पुढारी वापर करतात. मात्र विद्यमान पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे हे अवैध धंद्याविरोधात डोईजड ठरत असल्याने आगामी काळात लोकसभा व विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिंदे यांच्या बदलीसाठी काही पुढार्‍यांचे प्रयत्न सुरु असून तसा प्रस्ताव मुख्यमंत्र्याकडे पाठविल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

चोरुन चित्रीकरण, रंगेल पार्टी प्रकरणे भोवणार
अधीक्षक दत्ता शिंदे यांच्या काळात 31 डिसेंबर रोजी शहरात एका पुढार्‍याच्या फार्म हाऊसवर रंगेल पार्टी झाली. याप्रकरणाची थातूरमातूर कारवाईमुळे राज्यात चर्चा झाली. यात कलमे बदलून कारवाईतून पुढार्‍यांना, प्रतिष्ठितांना वगळल्याने कारवाईत आखडते हात घेतल्याने हे प्रकरण भोवण्याची शक्यता आहेत. तर दुसरीकडे नुकत्याच पंतप्रधानांच्या दौर्‍याचे जळगाव विमानतळावर कडक बंदोबस्त भेदून चोरुन चित्रीकरणाचा प्रकार घडला. याची गुप्तचर यंत्रणांकडून दखल घेण्यात आली. ही दोन्ही प्रकरणे अधीक्षक शिंदे यांना भोवणार असून या दोन्हीचा ठपका ठेवून यामुळे कार्यकाळ संपण्यापूर्वीच बदली होण्याची शक्यता आहे.

अवैधधंदेवाल्याच्या सलगीमुळे कर्मचारीही विरोधात
अवैधधंदे व्यावसायिकांशी संबंध असलेले विशेष पोलिसांची नवचैतन्य कोर्सच्या माध्यमातून झाडाझडती झाली. एलसीबीची बीट संकल्पना रद्द झाली. यामुळे काही पोलीस कर्मचार्‍यांचीही अनेक वर्षापासून पगारा व्यतिरिक्तची रसद बंद झाल्याने शिंदे यांच्याविरोधात असलेल्या काही पोलीस कर्मचार्‍यांचाही पुढार्‍यांकडे शिंदे यांच्या बदलीसाठी पाठपुरावा सुरु असल्याची माहिती मिळाली आहे.

अधीक्षपदासाठी यांच्या नावाचीही जोरदार चर्चा
शिंदे यांची बदली झाल्यास त्यांच्या जागी बदलून येणार्‍या काही अधिकार्‍यांची नावे समोर येत आहे. यात नाशिक ग्रामीणला पोलीस अधीक्षक असलेले संजय दराडे, वर्ध्याचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली व वाशिमचे मोक्षदा पाटील यांचा समावेश आहे. यात दराडे हे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या मर्जीतले असल्याने त्यांना संधी मिळू शकते. तर मोक्षदा पाटील यांच्यासह बसवराज तेली यांच्याही नावाची जोरदार चर्चा आहे.

अशा सुरु आहेत गंमतीशीर चर्चा

शहरासह जिल्हाभरातील पोलीस ठाण्यांमध्ये अधीक्षक शिंदे यांच्या बदलीची जोरदार चर्चा सुरु आहे. यातून काही गंमतीशीर बाबी समोर आल्या आहेत. त्या जनशक्तीने वाचकांसाठी मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

  • 1 अधीक्षक शिस्तप्रिय आहेत, रंगेल पार्टी प्रकरणात झालेला राजकीय दबाव, व त्यातून झालेली थातूरमातूर कारवाई अशा प्रकारे राजकीय दबावातून काम करण्याची मानसिकता नसल्याने दत्तात्रय शिंदे यांनी बदलीची विनंती केली आहे.
  • 2 जिल्ह्यात आजपर्यंत संपूर्णपणे अवैधधंदे बंद झालेले नाहीत. यात अनेक पुढारी, नेत्याचे साटेलोटे आहे. या अवैधधंद्याच्या विरोधात असल्याने शिंदे यांची बदली होवू शकते. यानंतर अवैधधंदे पूर्ववत होवून आगामी निवडणुकांमध्ये पुढार्‍यांसाठी पैसा उभा करता येईल.
  • 3 पंतप्रधानांच्या दौर्‍यात चोरुन चित्रीकरण झाल्याच्या प्रकरणात बंदोबस्तातील पोलीस कर्मचार्‍यांच्या हलगर्जीपणाचा शिंदे यांच्यावर ठपका ठेवला जावून वरीष्ठ पातळीवरून कारवाई म्हणूनही त्यांची बदली होवू शकते.
  • 4 आगामी काळात निवडणुकांमध्ये अधीक्षक म्हणून दत्तात्रय शिंदे हे नको असलेल्या पुढार्‍यांकडून मुख्यमंत्र्याकडे शिंदे यांची बदली करावी यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला असून मुख्यमंत्री यांच्या स्वाक्षरीनंतर त्यांच्या बदलीचे आदेश निघण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री गुरुवारी जिल्हा दौर्‍यावर असल्याने स्वाक्षरी अभावी आदेश निघाले नाहीत अशी माहिती सुत्रांकडून मिळते.

अधीक्षपदासाठी यांच्या नावाचीही जोरदार चर्चा
शिंदे यांची बदली झाल्यास त्यांच्या जागी बदलून येणार्‍या काही अधिकार्‍यांची नावे समोर येत आहे. यात नाशिक ग्रामीणला पोलीस अधीक्षक असलेले संजय दराडे, वर्ध्याचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली व वाशिमचे मोक्षदा पाटील यांचा समावेश आहे. यात दराडे हे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या मर्जीतले असल्याने त्यांना संधी मिळू शकते. तर मोक्षदा पाटील यांच्यासह बसवराज तेली यांच्याही नावाची जोरदार चर्चा आहे.

अधीक्षकांकडून प्रतिसाद नाही
बदलीच्या प्रकरणात सुरु असलेल्या चर्चांबाबत जनशक्तिने अधिक्षक श्री.शिंदे यांच्याशी मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. यामुळे संपर्क न झाल्याने प्रतिक्रिया कळू शकली नाही.