नंदुरबार । नंदुरबार नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीसंदर्भात नंदुरबार येथे विविध पक्ष व जनसंघटनांतर्फे प्राथमिक बैठक झाली. यात समाजवादी पक्ष, माकपा, भारिप बहुजन महासंघ, राष्ट्रीय समाज पक्ष, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष, रिपाई गवई गट या पक्षांचे प्रतिनिधी संख्येने उपस्थित होते. यावेळी बैठकीत आगामी न.पा.निवडणुकीत इतर सर्व धर्मनिरपेक्ष जनसंघटनांनी व पक्षांनी सहभागी होणे, शहरातील जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर एकत्रित येवून संयुक्त कार्यक्रम पत्रिका तयार करणे, सर्व जनसंघटना व पक्षाची समिती तयार करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. पुढील व्यापक बैठक दि.24 जून रोजी येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन प्रकाश सुळ, दीपक भालेराव यांनी केले आहे.