मुंबई : नुस्त निवडणूक जिंकून लोकांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारता पण त्यांच्या समस्या कोण सोडवणार ? असा सवाल नितेश राणे यांना विधानसभेत विचारला. नियम 293 अन्वये मुंबईसह राज्यातील महापालिकांच्या समस्यांवर विरोधकांच्या वतीने मांडलेल्या स्थगन प्रस्तावावर राणे बोलत होते.
नितेश राणे म्हणाले, ” आज झालेल्या चर्चेत मुंबई महापालिकेच्या आवतीभवती चर्चा झाली. चर्चेत सहभाग घेतलेल्या दहा पैकी नऊजणांनी मुंबईच्या समस्या मांडल्या आहेत. मुंबईची चर्चा कोकणाशिवाय पुर्ण होत नाही कोकणात मुंबई अन् मुंबईत कोकण आहे असं म्हणलं जातं. येत्या गणपती उत्सवामध्ये मुंबईकर मोठ्याप्रमाणात कोकणात जाणार आहे. त्या कोकणातील रत्नागिरी पालिकेच्या समस्याकडे लक्ष द्यावे. कोकणात आठ नगरपंचायती आहेत. त्यातील वैभववाडी, देवगड, आणि कणकणवली या तीन नगरपंचायती माझ्या मतदार संघात आहेत. त्यांच्या अवस्थेकडे मी लक्षवेधत आहे. त्या नगरपंचायतीमध्ये कर्मचाऱ्यांची अपूरी संख्या आहे. त्यांच्याकडे निधीची कमतरता आहे. त्यानगरपंचायतींना मुख्य कार्यकारी आधिकारी नाहीत. वैभववाडी, देवगड, आणि कणकणवली या तीन नगरपंचायतीसाठी एकच मुख्यकार्यकारी आधिकारी आहे. देवगड आणि वैभववाडीमधीव नागरिकांना घराचे परवाने घेण्यासाठी कणकवलीला जावं लागते. नुस्त निवडणुका जिंकून लोकांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारता पण समस्या कोण सोडवणार ? असा सवाल राणे यांनी उपस्थित केला.
नितेश राणे पुढे म्हणाले, ” कणकवलीमध्ये पार्किंगसाठी जागा आरक्षीत केली. त्याबाबत नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांच्याकडे 12 एप्रिल 2017 रोजी पार्किंगसंबधी बैठक झाली खासगी विकासकाकडून या बैठकित रणजीत पाटीलसाहेब तुम्हाला चुकिची माहिती दिली आहे. खासगी विकासकाकडून होणारी पार्कींगचे बांधकामासंबधी परवाण्याची माहिती दिशाभूल करणारी आहे. या पार्किगचा प्रस्ताव ग्राऊंड प्लस दोन मल्टीस्टोरेज आहे. त्यामुळे त्यामुळे त्याला अग्नीसुरक्षेसंबधीची नाहरकत परवान्याची आवश्यकता आहे. त्या पार्किंगमध्ये काही चुकीचे घडले तर पाटीलसाहेब आपलं मंत्रीपद धोक्यात येईल. या पार्किंगच्या समस्याबाबत कणकवलीच्या 17 नगरसेवकांपैकी 15 नगरसेवकांनी बैठकिचे पत्र मुख्याधिकारी अनिरूध्द तावडे यांना दिले.व बैठक लावली पण ते बैठकिला येत नाहीत. मी आमदार म्हणून बैठक लावली पण तरीही ते बैठकिला येत नाहीत. त्यामुळे आपण याप्रश्नात लक्ष घालावे. कारण तो मुख्याधिकारी भ्रष्टाचारी आहे. विकासकांनी केलेल्या कामाचे पैसे मंजूर करण्यासाठी मुख्याधिकारी पैसे मागतात. त्यामुळे आमच्या जिवाशी खेळणाऱ्या अधिकाऱ्याला पदावर रहाण्याचा अधिकार नाही. त्यामुळे रणजीत पाटीलसाहेब भ्रष्टाचाऱ्याला तुम्हा पाठिशी घालू नये अशी विनंती नितेश राणे यांनी केली.