भुसावळ। पालिका निवडणूकीत प्रभागा क्रमांक 12 मधून पुजा सुर्यवंशी या निवडून आल्या. मात्र काही तरुणांनी मतदानाला सहकार्य न केल्यामुळे सुर्यवंशी यांच्या विरोधात पराभूत झालेल्या उमेदवाराच्या परिवाराकडून मारहाण करण्याच्या तसेच खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्या जात असल्यामुळे संरक्षण मिळण्यासाठी उपविभागीय अधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
यांनी दिले निवेदन
निवडणूकीचा वचपा काढण्यासाठी पराभूत उमेदवाराच्या परिवाराकडून अशा प्रकारच्या धमक्या येत असल्यामुळे या तरुणांनी उपविभागीय अधिकार्यांना निवेदन दिले याप्रसंगी इमरान शाह, शेख युसूफ शेख बशीर, आसिफ मलीक, मोसीन शेख, सय्यद अखलाक, जुबेर मस्ताब, गोलु पिंजारी आदींच्या स्वाक्षर्या आहेत.