शिंदखेडा । तालुक्यातील साहूर गावाची ग्रामपंचायत निवडणूक ग्रामपंचायत स्थापनेपासून म्हणजे 1964 पासून बिनविरोध होत आहे. या पंचवार्षिक निवडणूकीमध्येही गाव पातळीवर पक्षीय राजकारण बाजूला ठेवून गावकर्यांनी एकजूट होत संरपचसह सर्व सदस्यांच्या जागा बिनविरोध केल्यात. यात सरपंचपदी उषाबाई लोटन कुंवर, उपसरपंच नाना पौलाद सोनवणे तर सदस्य भिलाबाई विठ्ठल कोळी, श्रावण सोनवणे, धारू कोळी, शोभाबाई रघुनाथ सोनवणे, जेठीबाई मंगा भिल, कुसूमबाई पुंजू भिल यांची बिनविरोध निवड झाली.
साहूर हे गाव पूरग्रस्त गाव असून अनेक वर्षांपासून साहूर हे गाव पूर्नवसनासाठी आंदोलन करीत आहे. मागील काळात शेतकरी व टोकरे कोळी समाजासाठीसुद्धा या गावाने आंदोलनात पुढाकार घेतला होता. या गावत बहुसंख्य आदिवासी टोकरे कोळी समाज राहतो. तर आदिवासी भिल्ल समाजाची थोडीफार घरे आहेत. गावाच्या पुर्नवसनाचा प्रश्न मार्गी लागावा तसेच गावाचा विकास व्हावा म्हणून गावकरी या ठिकाणी एकत्र येऊन निर्णय घेतात. गावकर्यांनी तापी काठावर महर्षी वाल्मिक ऋषीचे मंदिर बांधलेले आहे. या मंदिराचा विकास केल्याने गाव राज्यभर नावारूपाला यावे यासाठी प्रयत्न करत आहेत. दोन वर्षांपासून वाल्मिक जयंतीला यात्रा भरविण्यात येत आहे. गावात एकजुटीने काम व निर्णय घेतला जातो. ग्रामपंचायत बिनविरोध व्हावी म्हणून विद्यमान सरपंच तान्हाभाऊ सोनवणे, पंचाय समिती सदस्य शानाभाऊ सोनवणे, माजी सरपंच पोपट दगा, हिम्मत सोनवणे, श्रीराम कोळी, पोपट सुकलाल, निंबा सोनवणे, तंटामुक्तींचे अध्यक्ष कौतीक कोळी, हिरालाल कुंवर, ताथू वना, बाबु वना, लक्ष्मण सुका, राम पटेल, पौलद शिरसाठ, खुशाल झिपा, सितराम दंगल, राजराम कुंवर, गंगाराम शिरसाठ, मोतीलाल दौलत, रामचंद्र कुंवर, मधुकर सोनवणे, मोतीलाल प्रताप, जगन भगा, पुंडलिक सोनवणे, दगा महादू, विठ्ठल वनखंडा, हिरालाल निकुम, पंडीत सोनवणे, अमृत भिका, यशवंत हिरजी, वया नाईक, भाईदास भिल, पदम ढिवरे, भगवान ढिवरे, जंगल भिल, किसन भिल, शंकर भिल, बाबु महाले, गणेश पटेल, विठ्ठल वाकडे, भटू जगदाळे, सुरीसिंग भिल आदींनी कामकाज पाहिले.