केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी घेतला निवडणूक पूर्व तयारीचा आढावा
जळगाव दि. ४ :– लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीकरिता जळगाव व रावेर या लोकसभा मतदार संघाच्या निवडणूकीची प्रशासनाने जय्यत तयार केली असून या तयारीचा आज केंद्रीय निरीक्षक (सर्वसाधारण) छोटेलाल पाशी, डॉ. अजयकुमार व असिम विक्रांत मिंज यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा घेतला.
जळगाव लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन.पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, अपर जिल्हाधिकारी तथा रावेर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी गोरक्ष गाडीलकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी संजय मस्कर, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे याच्यासह सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत केंद्रीय निवडणूक निरीक्षक यांनी जळगाव लोकसभा व रावेर मतदार संघातील निवडणूकीसाठी नियुक्ती करण्यात आलेले अधिकारी/कर्मचारी, पोलीस बंदोबस्त, चेक पोस्ट, पोलीस स्टेशन, ई.व्हिएम, व्हिव्हिपॅट यंत्रे स्ट्राँगरुम, प्रतिबंधात्मक कार्यवाही, आचारसंहितेची अंमलबजावणी, सी.व्हीजील पवर प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर भरारी पथक, स्थायी निगरानी पथक तसेच स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदार जानजागृतीसाठी केलेल्या प्रचार व प्रसार, दिव्यांग मतदारांना मतदानाच्या दिवशी पुरविण्यात येणार्या सुविधाबाबतची माहिती जाणून घेतली. यावेळी डॉ. अजितकुमार उपस्थिताना म्हणाले की, निवडणूका शांततेत पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणाने आपल्यावर सोपविलेली जबाबदारी व्यवस्थीत पणे पार पाडावी. एकामेकामध्ये समन्वय राखणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर अवैध मद्य वाहतुक राखण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत ही त्यांनी सुचना दिल्यात.
पोलीस यंत्रणा केंद्रीय निरीक्षक असिम विक्रांत मिंज यांनी पोलीस चेकपोस्ट वाढविणे, नाकाबंदी, सिमावर्ती भागात गस्त व तपासणी वाढविण्याबाबत सुचना केल्यात. क्रिटीकल मतदान केंद्रीवरील बंदबस्ताच्या आराखडा तयार करण्याच्या सुचना दिल्यात. तसेच संवेदनशील भागात पोलीस दलाने संचलन करुन कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी वातावरण निर्मिती करण्याच्या सुचना त्यांनी दिल्यात. निवडणूका शांतेत पार पाडण्यासाठी प्रशासनाने केलेल्या तयारीचे संगणकीय सादरीकरण जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले.