निवडणूकी संदर्भात राष्ट्रीय समाज पक्षाची बैठकीत

0

जळगाव । अगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पचायत समिती निवडणुकी संदर्भात राष्ट्रीय समाज पक्षाची बैठक शहरातील पद्मालय गेस्ट हाऊसमध्ये पार पडली. यावेळी निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची चाचपणी करण्यात आली. यावल, मुक्ताईनगर, रावेर, चोपडा,अमळनेर, चाळीसगाव या ठिकाणी उमेदवारांची नावे निश्‍चीत करण्यात आली असून लवकरच यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. तसेच यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाच्या भुसावळ, मुक्ताईनगर, जळगाव तालुका अध्यक्षाची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती पत्राकाद्वारे देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अनिल सपकाळे होते. यावेळी मुरलीधर पवार, अनिल वर्मा, मिराताई सोनवणे, निर्मलाताई रेलकुटवार, अभय चंद्रात्रे, मिलींद शिरसाठ, मधुकर भोई, कमलाकर बाविस्कर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिपक सुरळकर यांनी तर आभार पप्पु बाविस्कर यांनी मानले.