नंदुरबार। भारत निवडणुक आयोगाकडुन जे पात्र व प्रथम मतदार आहेत तथापि, काही कारणाअभावी त्यांचा मतदार यादीत समावेश झाला नाही अशा मतदारांचा मतदार यादीत समावेश करण्यासाठी 31 जूलै 2017 पर्यंत मोहिम राबविण्यात येत असून मोहिमेअंतर्गत नवीन मतदार शोधसंपर्क यात्रा मोहिमही राबविण्यात येत असल्याची जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी एका शासकीय प्रसिध्दी पत्रकानुसार दिली आहे.
नवीन मतदार शोध संपर्क यात्रा मोहिम 12 जुलै, 2017 ते 31 जुलै, 2017 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. तहसिल स्तरावर मंडळ निहाय (मंडळ अंतर्गत गावे, पाडे व वाडया) याठिकाणी निवडणुक नायब तहसिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली फिरते पथक नियुक्ती करण्यात आलेली आहेत.