निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे यांची धुळ्याला बदली

0

जळगाव – आगामी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभाच्या पार्श्वभूमीवर उपजिल्हाधिकरी संवर्गातील अधिकाऱ्यांची अंतर जिल्हा बदलीचे आदेश मंगळवारी प्राप्त झाले असून यात २१ जणांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासनातील निवडणूक विभागाचे उपजिल्हा निवडणूक अधिकरी प्रमोद भामरे यांची बदली धुळे येथे उपजिल्हा निवडणूक अधिकारी या पदावर नियुक्ती करण्यात आली तर धुळे येथील उपजिल्हा निवडणूक अधिकारीपदी असलेले तुकाराम हुलवळे यांची बदली उपजिल्हा निवडणूक अधिकरीपदी नियुक्ती करण्यात आली.