फैजपूर- यावल तालुक्यातील न्हावी येथील रहिवासी व फैजपूर जे.टी.महाजन पॉलीटेक्निकमधील शिक्षक असलेल्या पंकज गोपाळ चोपडे (35) हे 22 रोजी निवडणूक साहित्य घेवून जाताना चक्कर येवून पडल्याने त्यांच्यावर जळगावातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. 23 रोजी त्यांची उपचार सुरू असताना प्राणज्योत मालवली.
कुटुंबातील सदस्याला नोकरी देण्याची मागणी
22 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीचे साहित्य ताब्यात घेताना पंकज चोपडे यांना अचानक चक्कर आल्याने ते खाली कोसळले. त्यांना उपचारार्थ जळगावातील डॉ.मिलिंद वायकोळे यांच्याकडे उपचारार्थह हलवण्यात आले. उपचार सुरू असतानाच 23 एप्रिल रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. घरातील कर्ता पुरूष व कुटुंबाचा आधारवड गेल्याने चोपडे ककुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मयत शिक्षाच्या पश्चात पत्नी, दोन मुली, वृद्ध आई-वडील असा परीवार आहे. दरम्यान, निवडणुकील राष्ट्रीय कर्तव्य मानले जात असल्याने प्रशासनाने सुद्धा अश्या घटनेसाठी केवळ आर्थिक तरतूद न करता त्या कुटूंबातील एका व्यक्तीला तत्काळ शासन सेवेत रुजू करून त्या कुटूंबाप्रती कर्तव्य पार पाडावे, अशी अपेक्षा शिक्षकांमधून व्यक्त केली जात आहे.