निवडणूक कर्मचार्‍यांच्या मानधनासाठी चकरा

0

तहसील प्रशासनाच्या बेफिकीरी संताप

भुसावळ– ग्रामपंचायत निवडणूक काम केलेल्या कर्मचार्‍यांना तहसील प्रशासनाच्या बेफिकीरीने मानधनासाठी तब्बल चार वर्षांपासून तहसीलभोवतीच्या चकरा माराव्या लागत असल्याने त्यांच्यात तीव्र संतापाची भावना आहे. वराडसीम, गोजोरा ग्रामपंचायतीची 29 मार्च 2013 रोजी निवडणूक झाली होती तर त्यातील तब्बल 25 कर्मचार्‍यांना निवडणूक भत्त्यांचे मानधन अद्यापही देण्यात आलेले नाही. याबाबत शिक्षक कर्मचार्‍यांनी वारंवार तहसीलदार कार्यालयात निवेदन देवूनही दखल घेण्याचे गांभीर्य प्रशासनाने दाखवलेले नाही.

चार वर्षांपासून कर्मचारी झिजवताय उंबरठे
वराडसीम, गोजोरा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर अशा एकूण 22 ते 25 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली होती. 29 मार्च 2013 रोजी ही निवडणूक प्रक्रिया पार पडली मात्र चार वर्ष व दोन महिने उलटूनही या कर्मचार्‍यांना निवडणूक भत्ता मिळालेला नाही. याबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे पदाधिकारी गिरीष नेमाडे व पंडीत नेहरु विद्यालय, वराडसीम येथील शिक्षकांनी तहसीलदारांना निवेदन देवून मानधन त्वरीत मिळावे, अशी मागणी केली आहे.