संभाजी राजे नाट्यगृहात दोन सत्रात मशिन हाताळणी प्रशिक्षण
जळगाव – जिल्ह्यासह राज्यात सर्वत्र विधानसभेची रणधुमाळी सुरु झाली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर जळगाव शहर मतदारसंघ क्र. 13 साठी नियुक्त 1200 कर्मचार्याांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. या प्रशिक्षणाला दांडी मारणार्या 132 कर्मचार्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच दुसर्या दिवशी होणार्या प्रशिक्षणासाठी हजर रहा अन्यथा कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी दिपमाला चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी संभाजीराजे नाट्यगृहात सकाळ व दुपार अशा दोन सत्रात प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. या प्रशिक्षणासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था महाविद्यालयाचे प्रशिक्षित ट्रेनर व सेक्टर अधिकारी यांचा समावेश होता. यात सकाळी 10 ते 12 या वेळेत 600 कर्मचार्यांना तर दुसर्या सत्रात उर्वरीत 600 जणांना 12 ते 2 व 3 ते 5 या वेळेत मशीन हाताळणी प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षसाठी 13 पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. प्रशिक्षणाच्या यशस्वितेसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्यांनी परिश्रम घेतले. तसेच या प्रशिक्षणाला विविध विभागांचे कर्मचारी उपस्थित होते.
…तर दांडीबहाद्दरांवर होणार कारवाई
1200 कर्मचार्यांपैक्ी एकूण 1068 कर्मचारी प्रशिक्षणाला हजर होते. तर प्रशिक्षणाला पहिल्या सत्रात 76 तर दुसर्या सत्रात 56 असे एकूण 32 कर्मचारी हजर होते. त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून उद्या होणार्या प्रशिक्षणासाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. उद्या हजर न राहिल्यास कारवाईचा इशाराही निवडणूक निर्णय अधिकारी दिपमाला चौरे यांनी दिला आहे.
निवडणूक खर्चाबाबत निरिक्षकांची बैठक
आचरसंहिता व उमेदवारांच्या खर्चाबाबत नियंणसाठी 6 स्थिर पथक, 6 फिरते पथक, 2 व्हिडीओग्राफी पथक नियुक्त करण्यात आले आहे. त्यांची महापालिकेच्या कार्यालयात निवडणूक खर्च निरिक्षक संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक झाली. उमेदवारांच्या सभा, बैठका, मिरवणुकांवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या तसेच या खर्चाचा काटेकोर व वस्तुनिष्ठ चित्रिकरण करण्याच्या सुचना देण्यात आल्या. विनापरवानगी कृती निदर्शनास आल्यास तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही संजीवकुमार यांनी दिले. बैठकीस सहा.निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली हिंगे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.