निविदा कागदपत्र घेण्यास दिला नकार

0

रावेर। विवरे खुर्द ग्रामपंचायतीच्या मुलभूत सुविधा योजनेच्या एकरा लाखाच्या कॉन्क्रिटीकरण कामाची ई निविदा काढण्यात आल्याने सोमवार 3 रोजी टेंडर भरण्याची शेवटची मुदत असल्याने रावेरातील कंत्राटदराने हे टेंडर भरून ग्रामविकास अधिकारी कुंदन कुमावत यांना डीडी व कामासंबंधीचे कागद पत्रे दिले असता त्यांनी घेण्यास नकार दिल्याने नव्या वाद उपस्थित झाला आहे. विवरे येथील ग्रामपंचायतीला 11 लाखाचे मुलभूत सुविधा योजनेतून काम मंजूर असल्याने या कामासाठी सोमवार 3 पर्यंत निविदा मागवण्यात आल्या होत्या.

जळगावातील व्यक्तीस मिळाली निविदा
या कामासाठी रावेरातील एका मजूर संस्थेने टेंडर भरले होते. शेवटचा दिवस असूनही केवळ 12 वाजेपर्यंत टेंडर स्वीकारण्याची मुदत असल्याचे कारण पुढे करून ग्रामविकास अधिकारी कुंदन कुमावत यांनी ई टेंडर भरल्या वर ग्रामपंचायतीला द्यावे लागणारे मन्युअल कागदपत्रांचा बंद लिफाफा घेण्यास नकार दिल्याने हा विषय थेट गटविकास अधिकारी सोनिया नाकोडे यांच्या दालनात गेल्यावर जळगावातील एका मानकर नामक व्यक्तीशी गटविकास अधिकारी सोनिया नाकोडे यांचे यासंबंधी कुमावत यांच्या मोबाईलवरून बोलणे झाल्याने या टेंडरची कागदपत्रे स्वीकारण्यास नकार देण्यात आला आहे.

कोण आहेत मानकर
जिल्हा परिषद बांधकाम विभागातील ग्रामपंचायत विभागाची टेंडर मॅनेज करण्याचे काम काही एजंट करत असून रावेर तालुक्यातील ग्रामपंचायतीचे टेंडर भरण्याचे काम रावेर पंचायत समितीच्या अधिकार्‍यांच्या माध्यमातून जळगाव येथील मानकरकडून केले जात असल्याचे खुद्द गटविकास अधिकारी सोनिया नाकोडे यांनी सांगितले. विकास कामांच्या माध्यमातून मिळणार्‍या मलाईसाठी मानकरच्या माध्यमातून सेटिंग असल्याचे जोरदार चर्चा आहे.

वेळेत टेंडर भरून निविदा उघडण्यापूर्वी टेंडर संबंधीचे डीडी वा अन्य कागदपत्रे देण्यासाठी गेलो होतो मात्र ग्रामविकास अधिकार्‍याने वेळ 12 वाजेची होती असे सांगून ते परत केले आहे. 3 रोजी टेंडर भरण्याची शेवटची मुदत होती टेंडर भरल्यावर मी त्या संबंधीचे कागदपत्रे देण्यासाठी गेलो मात्र मॅन्युअल कागदपत्रे स्वीकारण्यास त्यांनी नकार दिल्याने आता याबाबत गटविकास अधिकारी यांना माहिती दिली आहे मात्र त्यांनी याबाबत जिल्हा परिषदमधून मार्गदर्शन न घेता एका मानकर नामक व्यक्तीशी बोलून ते टाळले आहे.
योगेश महाजन, रावेर

टेंडरची कागदपत्रे घेणे हे संबंधित पंचायतीचा अधिकार आहे त्यामुळे त्यांनी त्यास नकार दिला आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतीचे टेंडर भरून देण्यासाठी जळगाव येथील मानकर यांना आम्ही निवडले आहे. त्यांच्याशी ग्रामसेवक यांना संपर्क करण्याचे सांगितले आहे. त्यांच्याशी माझे बोलणे झाले, त्यांनी वेळ संपल्याचे सांगितल्याने याबाबत कागदपत्रे घेता येणार नसल्याचे सांगितले आहे.
सोनिया नाकोडे,
गटविकास अधिकारी, रावेर