निविदा न काढता कोट्यवधीची खरेदी! शिक्षण मंडळात अपहार?

0

पिंपरी-चिंचवड : महापालिका शाळांची मागणी नसतानाही त्यांच्याकडून उशिरा मागणीपत्र घेण्यात आली. त्यानूसार शिक्षण मंडळाने सन 2016-17 आर्थिक वर्षांत विविध शैक्षणिक साहित्य खरेदी केली आहे. मात्र, निविदा न काढता कोट्यवधी रुपयांचे साहित्य खरेदी केल्याचे प्रकरण उघड झाले आहे. त्यामुळे खरेदीत ठराविक पुरवठादारांना ठेका देवून कोट्यवधीचा अपहार झाल्याची चर्चा मंडळात रंगली आहे.पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळाच्या पदाधिकार्‍यांची मुदत 2 जूनला संपली आहे. त्यामुळे शिक्षण मंडळ बरखास्त झाले आहे. आता नव्याने महापालिकेत शिक्षण समिती स्थापनेबाबत कार्यवाही सुरु आहे.

फर्निचर, लोखंडी कपाटे, पडदे, सोफा सेट, लोखंडी खुर्च्यांची खरेदी
शिक्षण मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी सन 2016-17 आणि 2017-18 या दोन वर्षांच्या कालावधीसाठी पुरवठा करण्यासाठी ठेकेदारांना मान्यता दिली होती. परंतू, महापालिका शिक्षण मंडळाने काही शाळांमध्ये आवश्यकता नसताना, विविध कार्यालयीन फर्निचर, लोंखडी कपाटे, पडदे, सोफा सेट, लहान व मोठे बेंच, मोठे रँक, लोंखडी खुर्च्यांची साहित्य खरेदी करण्यात आलेली आहे. शिक्षण मंडळाने फर्निचर खरेदीबाबत कपाट व पडदे खरेदीसाठी सुमारे 2 कोटी 18 लाख रुपयांची खरेदी केली आहे.

दीड कोटींची खरेदी
या खरेदीत शाळांची मागणी नसताना, त्यांच्याकडून मागणीपत्र देण्यास सांगण्यात आले. परंतू, मंडळाने कोणतीही निविदा न काढता भांडार विभागकडील मंजूर दरानेच पुर्नप्रत्ययी आदेश देवून साहित्याची खरेदी केलेली आहे. तसेच, लोंखडी बेंच खरेदी ही निविदा प्रक्रिया काढूनच शिक्षण मंडळाने केलेली आहे. त्याची खरेदी सुमारे 1 कोटी 50 लाखाची करण्यात आलेली आहे. त्यामुळे शिक्षण मंडळाने सन 2016-17 या आर्थिक वर्षात शालेय साहित्य खरेदी या लेखाशिर्षावर तरतूद उपलब्ध करण्यात आली होती. त्या खर्चामधून करण्यात आलेली आहे.

एकाही शाळेत पडदे बसले नाहीत
महापालिका शाळांसाठी खरेदी करण्यात आलेले पडदे अद्याप एका शाळांमध्ये बसविलेले नाहीत. ते पडदे त्या-त्या शाळांच्या खोलीत अडगिळी पडलेले आहेत. केवळ शिक्षण मंडळाच्या लेखाशिर्षावरील तरतूद खर्ची घालविण्यासाठी ही खरेदी केलेली आहे. काही खरेदीत निविदा प्रक्रिया देखील राबविण्याची तसदी शिक्षण मंडळाच्या अधिकार्‍यांनी घेतलेली नाही. तरीही कोट्यवधी रुपयांची खरेदी निविदा न काढता केलेली आहे. या खरेदी प्रक्रियेची चौकशी करुन संबंधितावर कडक करण्याची आवश्यकता आहे.

गतवर्षीच्या शाळांमधील खरेदी?
शिक्षण मंडळाने सन 2016-17 आर्थिक वर्षांत विविध शाळांच्या व कार्यालयीन आवश्यक फर्निचर साहित्य खरेदी करण्यात येणार होती. यामध्ये मे.साई सेवा एन्टरप्रायजेस यांनी इयत्ता 5 वी ते 7 वी च्या विद्यार्थ्यांसाठी 1000 नग लोखंडी मोठे बेंच 5227 मंजूर दराने खरेदी करणे, मे.निर्मिती इंजिनिअरिंग कार्पोरेशन यांनी इयत्ता 1 ली ते 7 वी च्या विद्यार्थ्यांना 1050 लहान व मोठे बेंच प्रत्येकी 5137 व 5227 मंजुर दराने खरेदी आणि मे.रेखा इंजिनिअरिंग वर्क्स यांनी इयत्ता 1 ली ते 7 वी च्या विद्यार्थ्यांना 1050 लहान व मोठे बेंच प्रत्येकी 5137 व 5227 मंजुर दराने खरेदी करणे, तसेच, मे.निर्मिती इंजिनिअरिंग कार्पोरेशन यांनी प्राथमिक शाळांसाठी 578 लोंखडी मोठे रॅकचा पुरवठा 6299 मंजुर दराने खरेदी करणे, मे.पी.शेषाद्री ऍन्ड कंपनी यांनी प्राथमिळ शाळांसाठी पडदे व कारपेटचा 130 शाळा निहाय पुरवठा 357 रुपये प्रति मीटर व 57 रुपये प्रति स्केवअर फूट दरवाजे, खिडक्या, मुख्याध्यापक कक्षाच्या उपलब्ध जागेनूसार खरेदी करणे, मे.रेखा इंजिनिअरिंग वर्क्स यांनी प्राथमिळ शाळांना 300 नग लहान कपाट खरेदी 6399 रुपये प्रति मंजुर दराने खरेदी करणे, त्या पुरवठा दारांकडून 425 नग मोठे लोखंडी कपाट हे प्रत्येक 5977 रुपये, 10,777 रुपये,2466 रुपये व 3777 रुपये प्रति मंजूर दराने खरेदी करणे, याच दराने मे.निर्मिती इंजिनिअरिंग कार्पोरेशन लहान लोखंडी कपाट खरेदी करणे, मे.शेषाद्री ऍन्ड कंपनी यांनी प्राथमिक शाळामध्ये 130 बुक केसचा 15577 मंजुर दराने खरेदी करणे, या ठेकेदारांनी विविध शैक्षणिक साहित्य खरेदी करुन पुरवठा करणार होते.