बामखेडा त.त.। शहादा तालुक्यातील जवळपास 225 कृषी सेवा केंद्र अस्तित्वात आहे.यात बामखेडा त.त. या गावासह परिसरातील वडाळी,कळंबु, सारंगखेडा, जयनगर, डामरखेडा मनरद, तलावडी, वैजाली, प्रकाशा,आदि गावांमधये कृषी सेवा केंद्र सुपर आहेत.काही दिवसापूवी कृषी विभागाकडून कृषी सेवा केंद्र मालकांना सुचना देणयात आली होती की, कृषी सेवा केंद्राचा दशनी बारात निविष्ठा विक्री परवाना,भाव फलक,साठा फलक,लावणयाची सुचना संबंधित विक्रेतयांना देण्यात आली असुन तसे न केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल.अशी सुचना देवूनही तालुकयातील कृषी सेवा केंद्राचा दर्शनी भागात लावण्यात आले नसल्याचे चिञ तालुकयात सर्वत्र दिसुन येत आहे.
अवाजवी व किंमतीपेक्षा वरचढ दर आकारून आर्थिक लुट
तालुक्यातील कृषी सेवा केंद्रामधये पर राज्यातील बी-बियाणे,बोगस बियाणे,खते,निविष्ठाची जादा व अवाजवी दराने विक्री करणार्या कृषी सेवा केंद्र मालकांवर कारवाई करण्याच्या सुचना असुनदेखिल या कृषी सेवा केंद्रामधून गुणवत्तायुक्त बियाणे, खते,विकली जात आहे की आणखी कोणती हा देखिल संशोधनाचा व वादाचा विषय तालुकयातील शेतकरी उपस्थित करित आहे.कृषी सेवा केंद्र मालकांनी कृत्रिम तुटवडा भासवून अशिक्षित शेतकर्याकडून आवाजवी व अवाच्या-सवा दर आकारून अधिक लुट सुरू केली आहे.
कृषी सेवा केंद्र मालक व विक्रेता अशिक्षित
शासनाचा नियमानुसार कृषी सेवा केंद्रात निविष्ठा विक्रीचा परवाना हा कृषी पदविका, कृषी पदवी ही शैक्षणिक पाञता आवशयक आहे.मात्र,तालुक्यातील कृषि सेवा केंद्रामध्ये विक्रेता व मालक हा खेडेभागात अशिक्षित असल्याने शेतकर्याना त्यासंबंधी योग्य माहिती,सल्ला,करण्यास असमर्थ आहे.परंतु खेडे गावाकडील शेतकरी अशिक्षित असल्यामुळे तो त्या विक्रेत्याला व मालकाला माहिती विचारण्यास सक्षम नाही.या सुचनाची पायमल्ली करणार्या कृषि सेवा केंद्र विक्रेता व मालकावर कृषी विभाग व भरारी पथक किती डोळसपणे काय कारवाई करते. हे पाहणे तेवढेच औत्सुक्याचे ठरणार आहे.