निवृत्तीधारकांची पेन्शन वाढणार; केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय

0

नवी दिल्ली – कोरोना संकटाच्या काळात कर्मचारी भविष्य निधी संघटनकडून पेन्शनधारकांना गुड न्यूज देण्यात आली आहे. आता निवृत्ताधारकांना वाढीव पेन्शन मिळणार आहे. सोमवारी ईपीएफओने बदललेली मूल्य पुनर्संचयित करण्यासाठी एकूण ९७३ कोटी जारी केले, या पेन्शनासाठी ८६८ कोटी रुपये तर थकबाकी म्हणून १०५ कोटी रुपये जाहीर करण्यात आले आहेत.
ईपीएफओकडून मे २०२० पासून निवृत्तीधारकांच्या बँक खात्यात वाढीव रक्कम अदा करण्यात येणार आहे. ईपीएफओ पेंशनधारकांना सेवानिवृत्तीच्या वेळी त्यांच्या मासिक पेन्शनच्या काही रक्कम एकरकमी देण्याचा पर्याय आहे. ईपीएफओ नियमांनुसार, २६ सप्टेंबर २००८ पूर्वी निवृत्त झालेल्या निवृत्तीधारकांना पेन्शनचा एक तृतीयांश एकरकमी मिळू शकेल, तर उर्वरित दोन तृतीयांश मासिक पेन्शन म्हणून त्यांच्या हयातीत दिले जाणार आहेत. दरम्यान, केंद्रीय विश्वस्त मंडळाची गेल्या वर्षी २१ ऑगस्ट रोजी बैठक झाली होती. त्यामध्ये त्यांनी २६ सप्टेंबर २००८ पूर्वी निवृत्त झालेल्यांची पूर्ण मासिक पेन्शन १५ वर्षांनंतर पुनर्संचयित करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली होती.काही दिवसांपूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आत्मभारत योजनेतंर्गत कंपनी व कर्मचार्यांच्या ईपीएफचे योगदान १२ टक्क्यांवरून १० टक्क्यांपर्यंत कमी करण्याची घोषणा केली. त्यामुळे कर्मचार्यांना जास्तीचा पगार घरी नेता येईल.