जळगाव। महापालिकेतील 2006 ते 2010 या कालावधीतील निवृत्तीधारकांना 6व्या वेतन आयोगाच्या फरक देण्यात आला आहे. परंतु, 2011 पासून ते आजपर्यंत निवृत्तीधारक लाभापासून वंचित आहेत. त्यांना देखील 6व्या वेतन आयोगाचा फरक देण्याची मागणी शहिद भगतसिंग मनपा कर्मचारी संघटनेतर्फे अनिल नाटेकर यांनी आयुक्त जीवन सोनवणे यांना निवेदनाद्वारे केली आहे.
संघटनेने माहितीच्या अधिकारात माहिती मागविली असता 2006 ते 2010 या कालावधीत 565 निवृत्तीधारकांना 6व्या वेतन आयोगाच्या फरकाचा लाभ मिळाला आहे. त्यांना पेशंनमध्ये 2 हजार रूपये अदा करण्यात येत आहेत. मात्र, 2011 पासून ते आजपावेतो 600 ते 700 कर्मचारी निवृत्त कर्मचार्यांना हा लाभ देण्यात आलेला नाही. अशी तक्रार संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे. कर्मचार्यांमध्ये भेद केल्याने प्रशासकीय कामावर कर्मचार्यांवर संशय व्यक्त होत करण्यात असल्याचे निवेदनात म्हटले आहे. तसेच कर्मचार्यांमध्ये असंतोषाची भावना निर्माण करण्यास प्रशासन व अस्थापना विभाग कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.