निवृत्त कला शिक्षक शेलकर यांना साने गुरूजी पुरस्कार

0

अमळनेर । येथील पुज्य साने गुरूजी ग्रंथालय व् मोफत वाचनालयाच्या वतीने देण्यात येणारा पुज्य साने गुरूजी पुरस्कार प. पु. हभप सदगुरू प्रसाद महाराज व् मान्यवरांच्या हस्ते सेवा निवृत्त कला शिक्षक मार्तंड ओंकार शेलकर यांना प्रदान करण्यात आला ग्रंथाल्यांच्या वतीने पुरस्कार देण्याचे हे दूसरे वर्ष आहे. या वेळी आमदार स्मिता वाघ, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, नपाच्या महिला व् बालकल्याण सभापती शितल यादव हे उपस्थित होत्या. शेलकर हे प्रताप हायस्कूलचे सेवानिवृत्त कला शिक्षक आहेत. त्यांच्या साधू या व्यक्तिचित्राला राष्ट्रीय पारितोषिक मिळालेले आहे.

पुरस्करासाठी योग्य व्यक्तीची निवड
मार्तंड ओंकार शेलकर यांनी विविध सामाजिक शैक्षणिक अध्यात्मिक संस्थाशी त्यांचा निकटचा संबंध आहे. हभप प्रसाद महाराज यांनी शेलकर सरांच्या कार्याचा व् कलेचा गौरवपूर्ण उल्लेख करुन संस्थेने योग्य व्यक्तीची निवड केली असे म्हणाले. आमदार स्मिता वाघ यानी ग्रंथालयाचे काम उत्कृष्टपणे सुरु असल्याचे प्रशस्तीपत्र दिले. शासनामार्फत ग्रंथालयास विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्‍वासन आमदारा वाघ यांनी यावेळी दिले. विविध क्षेत्रात यश मिळविणार्‍या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन दिनेश नाइक यांनी तर आभार चंद्रशेखर भावसार यांनी मानले. यावेळी मनोहर महाजन, सदस्य नगिनचंद लोढा, संदीप सोनवणे, आशिष चौधरी आदीसह मान्यवर उपस्थित होते.