गावातील सर्व मित्र मंडळांकडून सत्काराचे आयोजन
सजवलेल्या गाडीतून गावातून काढली मिरवणूक
वरखेडी – सैन्य दलातील निवृत्त होवून आलेल्या सैनिक बांधवाचा सत्कार सोहळा मोठ्या दिमाखदार पध्दतीने साजरा करण्यात आला. यावेळी त्यांची गावातून सजवलेली गाडीतून मिरवणूक काढण्यात आली. वरखेडी येथील योगेश शिवाजी पाटील हे 15 मराठा लाइट इन्फेंट्री (बुर्ज) बटालीयन भारतीय सैन्यदलातुन सेवानिवृत होवून गावी आली आसता. ग्रामस्थांनी त्यांचे जंगीस्वागत केले. यावेळी स्वराज युवा ग्रुप वरखेडी राजे शिवाजी मित्र मंडळ, शिवनेरी दुर्गा उत्सव मित्र मंडळ, जय बजरंग व्यायम शाळा, पंच क्रोशीतील ग्रामस्थ, नातेवाईक विविध संस्थाचे पदधिकारी मित्रपरीवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ठिकठिकाणी बजावली कर्तव्ये
योगेश पाटील हे डिसेंबर 1999 मध्ये सैन्य दलामध्ये भरती झाले होते सेवानिवृती वेळी ते नाईक पदावरती होते 19 वर्षेात त्यांनी जम्मु काश्मीर उरी सेक्टर, शिलॉग मेघालय, आसाम आरूणाचल, दिल्ली, कुपवाडा 41 राष्ट्रीय रायफल्स, दक्षीण अफ्रिका भारतीय शांतीसेनेत काम केले (यु.एन), कानपुर, गांधीनगर याठिकाणी आपली कर्तव्य बजावली. उपस्थित मान्यवराचे सेवानिवृत सैनिक आई-वडील शिवाजी पाटील, आई सुलोचना पाटील, भाऊ गणेश पाटील आणि योगेशची पत्नी ज्योतीबाला पाटील यांनी आभार मानले.
सत्कार प्रसंगी यांची होती उपस्थित
सत्कार समारंभ आ.किशोर पाटील, भुषण मगर, संतोष पाटील, अमोल शिंदे, शांताराम पाटील, पं.स.सदस्य ज्ञानेश्वर सोनार, शेतकी संघाचे डिगांबर पाटील, पप्पुशेठ जैन, सखाराम मराठे, संजय पाटील, सरपंच सिमा पाटील, उपसरपंच संतोष पाटील, ग्रा.पं. सदस्य दिपक बागुल, राकेश पाटील, सुभेदार नारायण, लक्ष्मण पाटील, सेवानिवृत सैनिक योगेश लोणारी, रामचंद्र कुमावत, निलेश कुमावत, पो.पा. वरखेडी खु दगडु गोसावी, पो.पा.वरखेडी बु बाळु कुमावत, डॉ.धनराज पाटील आदि होते.