दोंडाईचा- शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे येथील निवृत्त पोलीस कर्मचारी पी.एस.पाटील हे दोंडाईचा येथे नातेवाईकांच्या लग्नासाठी शनिवारी चारचाकी इंडिका (एम.18 व्ही. 499) ने परीवारासह आले होते. दुपारच्या वेळी महामार्गावर वाहनातून अचानक धूर निघत असल्याचे लक्षात येताच वाहन थांबवून कुटुंबियांना बाहेर उतरवण्यात आले. काही वेळातच वाहनाने पेट घेतला मात्र सुदैवाने जीवीतहानी झाली नाही. काही वेळेत अग्निशमन दलाच्या वाहनाने धाव घेत आग आटोक्यात आणली मात्र तो पर्यंत वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.