नाशविले (वॉशिंगटन) – दक्षिण अमेरीकेतील टेनेस्सी प्रांतातील ८७ वर्षाच्या निवृत्त पोस्टमन १३०० मुलांचा बाप असल्याचे डीएनए चाचणीतून स्पष्ट झाले आहे. कुटुंबाने खाजगी डीएनए तपास एजन्सीकडे हे काम दिले होते. इतक्या मोठ्या संख्येत अनौरस संतती जन्माला घालण्याचे सत्य चक्रावून टाकणारे असले तरी सत्य आहे.
डीएनए एजन्सीने नमुने तपासण्याचे काम सुरू केले. ते इतके सोपे नव्हते. पंधरा वर्षांहून अधिक काळ एजन्सी काम करीत होती. टेनेस्सी प्रांतात त्यांना खूप ठिकाणी फिरावे लागले. त्या वेळी गर्भनिरोधक साधने नव्हती. त्यामुळे मला लाज वाटण्याचे काहीच कारण नाही, असा पोस्टमनचा बचाव आहे. इतक्या महिला कशा काय तुमच्या मागे आल्या, हे गुपितही त्याने मुळीच लपवून ठेवले नाही. त्यावेळी संगीतकारक आणि नट जॉनी कॅशची क्रेझ होती. पोस्टमन महाशय त्या जॉनीची स्टाईल मारीत. बायकांना ते आवडायचे की त्या स्वतःची समजूत करून घ्यायच्या हे माहित नाही, असे पोस्टमन सांगतात.
खाजगी यंत्रणेचे सर्व्हेक्षण कर्मचारी सिद रॉय म्हणतात आम्हाला पोस्टमनचे पितृत्व इतके व्यापक असेल असे वाटले नव्हते. पुरी १५ वर्षे काम करून आम्ही थकलो. २००१ ला आम्हाला हे काम मिळाले. ज्यांनी काम दिले ते सुद्धा पोस्टमनचेच मुलगे निघाले. पुढे हे गुढ काम वाढत गेले. आता डीएनए टेस्ट तितकीशी महागडी राहिलेली नाही म्हणून हे काम करता आले, रॉय माहिती देतात.
पोस्टमनची इतकी मुले असल्याचे उघड झाले पण त्यांना या खऱ्या पित्याविरोधात न्यायालयात जायचे नाही. खरे तर आपण त्याची मुले आहोत ते बहुतेकांना इतरांना कळू द्यायचे नाही. बरेच जण सत्य कळले म्हणुनही कृतकृत्य झाले आहेत, याकडेही रॉय लक्ष वेधतात. रॉय यांच्या मते अजुन अनेक मुलांचा बाप हा पोस्टमन असू शकतो. १३०० हा आकडा १५ वर्षांच्या मेहनतीचे फळ आहे. अजुन शंभरएक तरी असतील का, या प्रश्नाचे उत्तर देण्यास मात्र रॉय नकार देतात.