जळगाव: कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विचारधारा प्रशाळेतंर्गत असलेल्या स्वामी विवेकानंद अभ्यास व संशोधन केंद्राच्या वतीने मंगळवार, दि. 11 सप्टेंबर रोजी निवृत्त मे.जनरल डॉ.जी.डी.बक्षी यांचे `भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसमोरील आव्हाने, विशेष संदर्भ सीमेपलिकडील दहशतवाद` या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
विद्यापीठाच्या सिनेट सभागृहात सकाळी 10 वाजता होणाज्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील हे राहतील. `भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसमोरील समकालीन आव्हाने` तसेच `भारताची दहशतवाद विरोधात असणारी संरक्षण यंत्रणा ` या विषयावर डॉ.बक्षी हे आपले मत मांडणार आहेत. या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन विचारधारा प्रशाळेचे संचालक प्रा.अनिल डोंगरे व केंद्राचे विभागप्रमुख प्रा.आर.बी.गोरे यांनी केले आहे.