पिंपरी-चिंचवड : मंत्रालयात ओळख आहे, त्याओळखीतून तुमचे पेन्शनचे काम करुन देतो असे म्हणत एकाने पिंपरी -चिंचवड महापालिकेचे निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. भास्कर काळू बच्छाव यांची तीन लाख रुपयांची फसवणुक केली आहे. या प्रकरणी पराग संतोष डिंगणकर (वय 38 रा. सिमा गार्डन हौसींग सोसायटी, शिक्षकनगर कोथरुड) याच्या विरुद्ध पिंपरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
बच्छाव महापालिकेच्या सेवेतून वैद्यकीय अधिकारी म्हणून 2008 साली निवृत्त झाले. यावेळी त्यांना निवृत्ती वेतन मिळावे यासाठी डिंगणकर यांच्याशी चर्चा केली असता माझी मंत्रालयात ओळख आहे. मी तुमचे काम करुन देतो असे सांगत डिंगणकर यांने बच्छाव यांच्याकडून 15 मार्च ते 27 नोव्हेंबर आठ महिन्याच्या कालावधीमध्ये कामासाठी म्हणून वेळोवेळी असे एकूण तीन लाख रुपये घेतले. याप्रकरणी बच्छाव यांनी आर्थिक फसवणुकीची तक्रार दिली असून पिंपरी पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.