मुंबई : सनी लिओनी कामाबरोबरच आपल्या कुंटुंबावरही खूप प्रेम करते. नुकताच तिची मुलगी निशाचा वाढदिवस पार पडला. निशाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ती मेक्सिकोला गेली होती.
सनीने आपल्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहे. यात सनी तिची मुलगी निशासोबत समुद्रकिनारी मस्ती करताना दिसत आहे. तसेच सनीचा पती डॅनिअलने कुंटुंबासोबतचा फोटो शेअर केला आहे. सनीने साधारण दोन वर्षांपूर्वी लातूरला भेट दिली होती. तिने तेथील एका अनाथ आश्रमातून जुलै २०१७ मध्ये २१ महिन्यांच्या निशाला दत्तक घेतले होते.