जळगाव– अहमदाबाद येथे दि.13ते 19 सप्टेंबरदरम्यान होणार्या 29 व्या अखिल भारतीय जी.व्ही.मावळणकर शुटींग चॅम्पीयनशिप स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा रायफल असो शिएशनचे 14 खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.
निशाणेबाजी स्पर्धेसाठी भावेश गवळी,मानव भोसले,मोहित नाईक,मो.साद ईस्माईल पिरजादे,प्रणव चंदनकर,खालीद नुरुल,आकाश मुराई,वसीम तडवी,प्रियंका पटाईत, दिलीप गवळी,हेमंत मांडोळे,दिपक कोळी,हरीष साळूंखे,गणेश मांडोळे यांची निवड झाली आहे.
संघ व्यवस्थापकपदी दिलीप गवळी
अहमदाबाद येथे होणार्या निशाणेबाजी स्पर्धेसाठी संघ व्यवस्थापक म्हणून मुख्य प्रशिक्षक दिलीप गवळी यांची निवड करण्यात आली आहे.संघ प्रमुखपदी हरीष साळूंखे तर उपसंघ प्रमुख म्हणून दिलीप मांडोळे यांची निवड जिल्हा असोचे अध्यक्ष विशन मिलवाणी यांनी निवड केली आहे. निवडीबद्दल मिलवाणी यांच्यासह प्रा.यशवंत सैंदाणे,सुनील पालवे,डी.ओ.चौधरी,विलास जुनागडे,प्रा.विनोद कोचूरे यांनी कौतूक केले.