अभय योजनेअंतर्गत मनपाची तीन महिन्यात ६ कोटींची वसुली

वर्षभराची मालमत्ता रक्कमेची ३८ कोटींची वसुली

जळगाव – मनपा प्रशासनाने मालमत्ता कराची थकीत वसुली करण्यासाठी आखलेल्या अभय योजनेअंतर्गत महापालिकेने दोन महिन्यात ६ कोटी रुपयांची थकबाकीची रक्कम वसूल केली आहे.

 

एकीकडे मनपा प्रशासनाने अभय योजनेअंतर्गत थकीत रक्कम वसूल करण्याची मोहीम सुरु केली असताना, आता दुसरी कडे २०२१-२०२२ या आर्थिक वर्षाचा मालमत्ता कराचा वसुलीकडे देखील आता महापालिकेने लक्ष दिले आहे.

गेल्या दोन वर्षांपासून महापालिका प्रशासनाने थकीत वसुली व्हावी यासाठी अभय योजना सुरू केली आहे. यावर्षी १५ नोव्हेंबर पासून ते २१ जानेवारीपर्यंत ही योजना राबवण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात थकीत रक्कम भरणार्‍या नागरिकांना दंडाच्या एकूण रकमेत ९०% , दुसर्‍या टप्प्यात ७५% तर तिसर्‍या टप्प्यात ५०% सूट देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. महापालिकेने आतापर्यंत ३८ कोटी ५६ लाख रुपयांची वसुली केली असून, महापालिकेला येत्या २ महिन्यात अजून १२ ते १५ कोटी रुपयांची वसुली करण्याचे आव्हान पार पाडावे लागणार आहे.

 

 

 

 

महापालिका प्रशासनाकडून दर वर्षी जानेवारी ते मार्च महिन्यादरम्यानच वसुलीवर भर दिला जात असतो. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून मालमत्ता कराचा वसुलीवर कोरोना मुळे मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. २०२० मध्ये मार्च महिन्यात लॉक डाऊन लागल्यामुळे वसुली झाली नव्हती. तर गेल्या वर्षी देखील कोरोना चा दुसर्‍या लाटेमुळे वसुलीवर परिणाम झाला होता. आता पुन्हा मनपा प्रशासनाने वसुलीवर भर दिला असतांनाच पुन्हा कोरोनाचे संकट महापालिका प्रशासनासमोर उभे राहिले आहे.

 

आतापर्यंत प्रभागनिहाय झालेली वसुली

 


प्रभाग समिती १ – १२ कोटी ५६ लाख ६४ हजार

प्रभाग समिती २ – ७ कोटी २२ लाख ६४ हजार

प्रभाग समिती ३ – ९ कोटी ८३ लाख ७१ हजार

प्रभाग समिती ४ – ८ कोटी ६४ लाख ५० हजार