निषेधाचा मोर्चा हा नंदुरबार काँग्रेसचा देखावा

0

नंदुरबार । अत्याचार करून महिलांना ठार मारण्याचा घटना निश्‍चित निषेध करण्यासारख्या आहेत. त्याला कुणीही समर्थन देऊ शकत नाही. बाहेरील राज्यातील महिलांवर जेव्हा अत्याचार होतो तेव्हा नंदुरबार काँग्रेस निषेध मोर्चा काढून देखावा निमार्ण करते. परंतु नगरपालिकेच्या आदिवासी नगरसेविकाला मारहाण केली जाते तेव्हा रस्त्यांवर का उतरले जात नाही, अशी खंत खा. हिना गावित यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. पंतप्रधान उज्ज्वला गॅस वाटपाची माहिती देण्यासाठी खा,हिना गावित यांनी पत्रकार परिषद बोलाविली होती. त्यात त्यांनी ही खंत व्यक्त केली.

नगरसेविकेसाठी मोर्चा का नाही?
खा. हिना गावित म्हणाल्या की, नंदूरबार नगरपालिकेच्या सभागृहात काँग्रेसच्या नगरसेवकांनी भाजपच्या एक आदिवासी नागरसेविकला मारहाण केल्याची घटना घडली आहे. तेव्हा काँगेसने का नाही निषेध मोर्चा काढला,जमू काश्मीर, गुजरात आदी बाहेरच्या राज्यात महिलांवर झालेल्या अत्याचाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी काँग्रेस नंदुरबारला मोर्चा काढते हा केवळ देखावा असून नाटकी सहानुभूती आहे,असा आरोप खा. हिना गावित यांनी केला. नंदूरबार मतदार संघात आतापर्यंत 35 हजार महिलांना गॅस वाटप करण्यात आला आहे. एकूण 2 लाख महिलांना गॅस वाटपाचे उद्दिष्ट असून त्या दृष्टीने नियोजन केले जाते आहे. 20 एप्रिल या दिवशी उज्जवल दिवस साजरा केला जाणार असून या दिवशी लाभार्थी महिलांना गॅस वाटप करण्यात येणार आहे, याची माहिती खा. हिना गावित यांनी दिली.