भुसावळ । जिवात्मा आठ तत्वांपासून तर पंच तत्वांपासून प्रकृतीने देह व सृष्टी निर्माण केली. जोपर्यंत शरीरात आत्मा आहे तोपर्यंत मनुष्याचा संसाराशी संबंध आहे. त्यामुळे तो भवसागरात अडकलेला असतो. आत्मा शरीराचा त्याग करून निर्गुण निराकार परमात्म्याच्या स्वरुपातच विलीन होतो. वेद व श्रीमद् भगवद्गीतेत प्रकृतीचे संपुर्ण स्वरुपाचे तत्वज्ञान सांगितले आहे. त्यानुसार निष्काम भक्तीतून आत्मसाक्षात्काराद्वारे मुक्ती मिळणे शक्य असल्याचे महंत डॉ. श्यामदास महाराज यांनी तालुक्यातील कंडारी येथे सांगतले.
यांची होती उपस्थिती
तालुक्यातील कंडारी येथील वाल्मिक मंदिरात श्रीमद् भगवद्गीता ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. कथावाचन श्यामदास उदासी करीत आहेत. याप्रसंगी महेंद पुरणदास उदासी, महंत रामदास उदासी उपस्थित होते.
कलियुगी भक्तीचा महिमा
याप्रसंगी भक्तीचा महिमा वर्णन करताना महंत श्यामदास उदासी म्हणाले की, सतीयुग, त्रेतायुग व द्वापर युगात तपश्चर्या तसेच यज्ञपूजेला महत्व होते. मात्र कलियुगात भगवंत नामस्मरणाला महत्व असून भक्तीद्वारे आपण सहज इष्टदेवतेला प्राप्त करून घेऊ शकतो. असेही सांगितले.