निष्ठावान शिवसैनिकांना डावलणार्‍यांची पक्षाने दखल घ्यावी

0

नगरसेवक मुकेश गुंजाळ : पक्षाला सावधगिरी बाळगण्याचा दिल्ला सल्ला

भुसावळ- गेल्या 30 वर्षापासून मी शिवसैनिक असून या संदर्भात पारकर यांना कल्पना नसल्याने व पक्षातील काही लोकांनी आपल्याबद्दल चुकीची माहिती दिल्यानंतर त्यांनी मी शिवसेनेत नसल्याचे स्टेटमेंट दिले असावे, अशी माहिती नगरसेवक मुकेश गुंजाळ यांनी कळवली आहे. भुसावळ शिवसेनेमध्ये दोन गट असून दुसरा गट पहिल्या गटाला पक्षाच्या कुठल्याही कार्यक्रमाला बोलावत नाही वा बैठकीत बोलावत नाही. रावेर लोकसभा संपर्कप्रमुख विलास पारकर यांनी आपल्याला बोलवून आपली बाजू ऐकून घ्यायला हवी होती मात्र तसे झाले नाही. असे असलेतरी आपला पक्षावर व पक्षश्रेष्ठींवर पूर्ण विश्वास आहे व न्याय मिळून सत्य जनतेसमोर येईल, अशी खात्री असल्याचेही गुंजाळ कळवतात. गेल्या काही वर्षात अशा तर्‍हेने कारस्थान करून व कट करून गटबाजी करून निष्ठावान शिवसैनिकांना डावलण्यात आल्याने पक्षश्रेष्ठींनी याची दखल घ्यावी व सावधगिरी बाळगावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.