निसर्गप्रेमी मित्रांनी जव्हार दाबोसा धबधब्याची केली स्वच्छता

0

पालघर : दाभोसा हा पर्यटकांचे मन जिंकनारा धबधबा आहे. त्यामुळे या धबधब्यावर आनंद घेण्यासाठी रोज शेकडो पर्यटक येतात. मात्र धबधबा परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले होते. पर्यटनस्थळी घाण पसरल्याने पर्यटकांकडून नाराजीचे सूर निघत होते. त्यामुळे जव्हार शहरातील निसर्गप्रेमी, सर्प व प्राणी मित्र यांनी पर्यटनस्थळी जावून शुक्रवारी दिवशी संपूर्ण दाबोसा धबधब्याची स्वच्छता केली. पर्यटकांकडून स्वच्छता करनार्यां निसर्गप्रेमींना कौतूकाची थाप मिळाली. धबधब्याच्या पायथ्याशी खाली उतरतांना प्लास्टिक पिशव्या, बियर, व्हिस्की, काचेच्या बाटल्या, कागदाचे तुकडे, फेकलेल्या पाणी बॉटल, असा दाबोसा परिसरात कचरा टाकून सर्वत्र घाण झाली होती. त्यामुळे पर्यटक नाराजी व्यक्त करत होते.

बाटल्या कचरा पेटीत टाकण्याचे आवाहन
दाबोसा धबधब्यावर मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, गुजरात, दादरानगर हवेली, या ठिकाणाहून रोज शेकडो पर्यटक येत असतात. तसेच दाभोसा धबधबा येथील वातावरण निसर्गरम्य असल्याने पर्यटकांचे मन सुन्न करून टाकते. मात्र या पर्यटन परिसरात पर्यटकांना घाण दिसत असल्याने नाराजी पसरत होती. मात्र निसर्गप्रेमी, सर्प व प्राणी मित्रांनी दाबोसा धबधब्याची स्वच्छता केल्याने त्यांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप्प मिळात आहे. त्यामुळे या परिसरात घाण, कचरा न करता, प्लस्टिक पिशव्या, काचेच्या बाटल्या कचरा पेटीत टाका असे आवाहन निसर्गप्रेमींनी केले आहे.

या निसर्गरम्य पर्यटनस्थळी पर्यटकांनी घाण करू नये. आपले पर्यटनस्थळ समजून स्वच्छता राखावी. दाभोसा परिसरात घाण, कचरा असल्याने आम्हा पर्यटकांना नाराजी वाटते. त्यामुळे पर्यटनस्थळी पर्यटकांनी स्वच्छता राखावी.
मनोज कामडी, पर्यटक.

धबधबा परिसरात घाण, कचरा, बियर बॉटल असे घाणीचे साम्राज्य पसरले होते. आम्हला ही बाब समजल्यावर आम्ही शुक्रवारी दिवशी एकत्र येवून या येथे साफसफाई केली. या परिसरात घाण करू नये.
– गणेश बोराडे, निसर्गप्रेमी.