निसर्गाचा समतोल राखणे गरजेचे

0

डॉ. वासुदेव साळुंखे : जागतिक ओझोन दिनानिमित्त कार्यक्रम

शिरूर । पर्यावरणाच्या जतन आणि संवर्धनासाठी आपण सर्वांनी जागृत होऊन निसर्गाचा समतोल राखणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन कोपरगाव येथील के. जे. सोमय्या महाविद्यालयातील भूगोल विषयाचे डॉ. वासुदेव साळुंखे यांनी केले. जागतिक ओझोन दिनाचे औचित्य साधून तळेगाव ढमढेरे येथील साहेबराव शंकराव ढमढेरे महाविद्यालयात भूगोल विभागाने आयोजित केलेल्या विशेष समारंभात ते बोलत होते. शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक महेश ढमढेरे, प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील, उपप्राचार्य डॉ.पराग चौधरी, भूगोल विभागप्रमुख डॉ. रवींद्र भगत, डॉ. संदीप सांगळे, डॉ.मनोहर जमदाडे, दत्तात्रय वाबळे, प्रा. विवेक खाबडे आदी याप्रसंगी उपस्थित होते.

पर्यावरण संतुलनासाठी प्रयत्न करा
पर्यावरणाचा होणारा र्‍हास घातक असून जागतिक तापमानाची होणारी वाढ ही जगापुढील आज प्रमुख समस्या आहे. यामुळे गंभीर धोका निर्माण होणार असल्याचे भाकीत साळुंखे यांनी व्यक्त केले. वेळीच हे संकट ओळखून प्रत्येकाने पर्यावरणाच्या संतुलनासाठी आपआपल्या परीने योगदान देणे गरजेचे आहे. यासाठी निसर्ग संवर्धनावर भर देण्यासाठी उपक्रम राबविण्याची गरज आहे. तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी पुढे सांगितले. महाविद्यालयातील भूगोल विभागप्रमुख डॉ. रवींद्र भगत यांनी आपल्या प्रास्ताविकात जागतिक ओझन दिनानिमित्तची पार्श्‍वभूमी विषद केली. प्रथम वर्ष कला या वर्गातील विद्यार्थिनी करिश्मा इनामदार हिने सूत्रसंचालन केले. तर, कल्याणी तोडकर हिने उपस्थितांचे आभार मानले.