निसर्ग आणि अध्यात्माचा संगम : गायमुख पर्यटनस्थळ

0

नवापूर (हेमंत पाटील) । नवापूर शहरापासुन 25 किलोमीटर गायमुख हे धार्मिक पर्यटनस्थळ आहे. चोहोबाजुनी घनदाट व निसर्गरम्य जंगल असुन या ठिकाणी पुरातन महादेवाचे मंदिर आहे. मंदिराचा खालचा भागात प्राचीन काळापासुन मंदिरातील दगडी शिल्प मुखातुन अखंडीतपणे पाण्याचा झरा वाहत आहे. ते सर्वाचे आकर्षण आहे. महाशिवरात्री व श्रावण महिन्यात महाराष्ट्र व गुजरात राज्यातील भाविक व पर्यटक तसेच शालेय विद्यार्थी यांची येथे गर्दी होते. मंदिराचा खाली 50 पायर्‍या उतरल्यावर तेथे सुंदर व आकर्षक धबधबा आहे. हा नैसगिक धबधबा निसर्ग प्रेमींना आकर्षित करत असतो. पर्यटक व भाविक तसेच शालेय विद्यार्थी निसर्ग रम्य सहलीचा आनंद लुटतात. त्यांचा आनंद वाढवा म्हणुन या श्रेत्राचा विकास शासनाचा पर्यटन विभाग करत आहे. या पर्यटनस्थळाचा विकासाला आधिक चालना मिळावी अशी मागणी केली जात आहे.

निसर्गसंपन्न सुखसुविधांनी सज्ज
पुर्वीचे गायमुख व आताचे यात विकासकामांमुळे खुपच बदल झाला आहे. भविष्यात येथील विकासाला अधिक चालना मिळणार आहे. जिल्हाचे पालकमंत्री व सुपुत्र यांच्याकडचे पर्यटन खाते आहे. त्यांनी गायमुखचा विकासाठी विशेष बाब म्हणुन भरीव निधी उपलब्ध करुन विकासाचा अधिक चालना देण्याची गरज आहे. मंदिराचा वरचा बाजुला उद्यान व बालगोपाल मंडळीसाठी विविध खेळणी असलेले बालउद्यान आहे. सावलीसाठी या लगत विविध प्रजातीचे वृक्ष व गुलाबवाटीका तसेच शोभीवंत झाडे आहते. या उद्यानाला जाळीदार कुंपन,पर्यटकांना बसण्यासाठी आकर्षक ओटे,बाक तसेच भोजनासाठी जवळच शेड व निवाराशेड आहे. याच बरोबर उपहारगृह, सुलभ शौचालय असुन बागेत पायवाटा विकसित करण्यात आल्या आहेत. तसेच प्रवेशद्वारावर आकर्षीत स्वागत कमान तेथेच पार्कींग व्यवस्था आहे. पुढे बगीचा व जवळच शाँपीग काँम्पलेक्समध्ये विविध प्रकारची दुकाने आहे. तसेच काहींनी शेड करुन दुकाने थाटली आहे. विविध जातीचे आकर्षक पक्षी व माकड येथे पाहायला मिळतात. बाराही महिने तुडुंब भरलेली पुरातन विहीर आहे. जवळ पाण्याचा सुंदर झरा व त्यावर लाकडी आकर्षीक पुल पर्यटकांना आकर्षित करतो. निसर्ग आणि अध्यात्माचा संगम असलेले गायमुख तिर्थक्षेत्राचा भविष्यात अधिक विकास होऊन याहुन अधिक सारे चित्र पालटलेले पाहायला मिळेल यासाठी गायमुख विकासाचे नवे पर्व राबविणे महत्वाचे ठरेल. पाठपुरावा व प्रयत्न करणे आवश्यक आहे.