निस्वार्थ हेतूने काम केल्याने हेतु साध्य होतो

0

अमळनेर : कोणतेही काम हे निस्वार्थ हेतुने केले तर,ते निश्चित च साध्य होते. दहा किलो लोखंड मिळविण्यापेक्षा फक्त एक ग्राम सोने मिळविले तर ते महत्वाचे असते. याकडे पत्रकारांनी विशेष लक्ष दिले पाहिजे असे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार यांनी केले.

अमळनेर येथील अखिल भारतीय पत्रकार संघटनेतर्फे ममता मतिमंद विद्यालयात पत्रकार दिनानिमित्त शैक्षणिक सहित्य व पोषण आहार चे वाटप करण्यात आले,त्या प्रसंगी ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष कुबेर वैद्य अध्यक्षस्थानी होते. प्रांताधिकारी संजय गायकवाड, ए पी आय अवतार सिंग चव्हाण,जी प सदस्य अ‍ॅड. व्ही आर पाटील,भिकेश पाटील,अ‍ॅड. जमील खान, संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष संभाजी देवरे, प्रा जयश्री साळुंखे, मुख्या. सुरेश महाले, माळी महासंघाचे जिल्हउपाध्यक्ष प्रवीण महाजन आदि आदी उपस्थित होते.

पवार पुढे म्हणाले की, ग्रामीण पत्रकारांनी शहरात सोने शोधन्याचा विधायक प्रयत्न केला आहे. त्यामुळे निस्वार्थ पत्रकारितेचे दर्शन या स्त्युत उपक्रमातुन होत आहे. प्रांताधिकारी गायकवाड़ म्हणाले की, लोकशाहिचा चौथा आधार असलेला पत्रकार अन्याय अत्याचार विरोधी संघर्ष करतांना समाज विधायक कार्य करतो. याचे उत्तम उदाहरण आजच्या ंघटनेच्या कार्यातून पहवयास मिळाले. नगरसेवक प्रा.अशोक पवार, बबली पाठक, श्याम संदानशिव साहेबराव शेजवळ आदिंनी पत्रकारांचा पूष्पगूच्छ देवून सत्कार केला. यावेळी यदुवीर पाटील,कुंदन खैरनार, गजानन पाटील, विजय पाटील,भाऊसाहेब वरुळे, शशिकांत पाटील,जयंत वानखेड़े,भानुदास पाटील,छोटू पाटील, संजय मिस्तरी,चेतन सुतार तसेच, अखिल भारतिय ग्रामीण पत्रकार संघटनेचे पदाधिकारी ऊपस्थित होते.वसंतराव पाटील यांनी प्रस्ताविक केले,प्रा.किरण चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले तर,प्रा.हिरालाल पाटील यांनी आभार मानले.