चिपळूण : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई), वैद्यकीय प्रवेश अभ्यासक्रमाचा निकाल जाहीर झाला आहे. यात ओरायन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या चिपळूण शाखेच्या १२, रोहा शाखेच्या २, कुडाळ शाखेच्या ३ अशा कोकणातील एकूण १७ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. ‘सीबीएसई’द्वारा घेण्यात आलेल्या या परीक्षेस १३ लाख २६ हजार ७२५ विद्यार्थी बसले होते. नीट परीक्षेची उत्तीर्णतेची टक्केवारी ५४ आहे.
यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांत चिपळूण शाखेच्या समरिन कोळथरकर, रुतुजा जगताप, बाझीला खोत, तन्वी इळके, विक्रम पानगले, रुतुजा कदम, कोमल सुर्वे, अमरा हिदायत, सुनाद मोहिते, रुक्सार परकार, इफ्तिशा लांबे, उम्मे मुकादम, ‘अनिवासी भारतीय विद्यार्थ्यांनी’ आदिती संजय कदम, रोहाच्या तारूल कौलकर, सौरभ देशमुख, कुडाळच्या लक्ष्मी राऊळ, प्रिती परब, आदित्य तांबे यांचा समावेश आहे.
अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेत ओरयनच्या चिपळूण शाखेच्या हर्षद माने, श्रेयस भावे, संकेत जाधव, सर्वेश भावे या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. यापूर्वीच जाहीर झालेल्या, जेईई मेन्स, ‘वेल्लोरे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि तामिळनाडू येथील विश्वप्रसिद्ध ‘एसआरएम’ विद्यापीठासाठी ओरयनच्या १३ विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे चिपळूणच्या परशुराम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. विनय नातू, गद्रे ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य शेंड्ये, ओरायन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स चिपळूणचे डायरेक्तर प्रसन्न राठोड यांनी अभिनंदन केले आहे. दरम्यान ओरायन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स चिपळूणची सन २०१८-२० च्या अकरावी-बारावी विज्ञान शाखेची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे.