नीट वैद्यकीय प्रवेश परिक्षेतील यशस्वितांचे कौतुक

0

शिरपूर । शिरपूर तालुक्यातील तांडे येथील श्री विलेपार्ले केळवणी मंडळ मुंबई संचलित मुकेशभाई आर. पटेल सैनिकी विद्यालयातील बारावी विज्ञान शाखेतील राहुल दत्तू जोरवर व किशन जगदीश पटेल या दोन विद्यार्थ्यांनी नीट – 2017 परिक्षेत चांगले गुण प्राप्त् करुन यश संपादन केले आहे.मुकेशभाई आर. पटेल सैनिकी विद्यालयातील बारावी विज्ञान शाखेतील राहुल दत्तू जोरवर व किशन जगदीश पटेल या दोन विद्यार्थ्यांनी नीट – 2017 परिक्षेत प्रत्येकी 131 गुण प्राप्त केले आहेत.

वैद्यकिय प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. त्यांना प्राचार्य दिनेशकुमार राणा तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. यतिन पाटील, प्रा. ज्ञानेश्वर पाटील, प्रा. अनिल रोकडे व प्रा.मनोज बहारे यांचे मार्गदर्शन लाभले.त्यांच्या यशाबद्दल एस.व्ही.के.एम. संस्थेचे अध्यक्ष माजी शिक्षणमंत्री आमदार अमरिशभाई पटेल, संस्थेचे सह-अध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, व्यवस्थापन समिती सदस्य राजगोपाल भंडारी, प्राचार्य दिनेशकुमार राणा व सर्व शिक्षक यांनी कौतुक केले आहे.