मुंबई: बॉलिवुड आणि टीव्ही उद्योगातील अभिनेत्री नीना गुप्ता यांनी सोशल मिडियात एक अशी पोस्ट शेअर केली ज्यामुळे सर्वांनाच या ६२ वर्षाच्या गुणी कलावंताबाबत हळहळ वाटली. पण त्यांच्या मुलीने आईचा फंडा सांगितल्यावर चुकचुकणारे कामाला लागले.
नीना गुप्ता यांनी इंस्टाग्रामवर आपले फोटो टाकून लिहलंय की मी मुंबईत रहाते. काम करते. चांगला अभिनय करते. मला अभिनय करण्यासाठी संधी हवी आहे. तशा पात्राच्या मी शोधात आहे.
आपल्या आईच्या या पोस्टने तिची मुलगी मसाबा गुप्ता खूपच हळवी झाली. तिने ही पोस्ट शेअर करीत म्हटले, काही दिवसांपूर्वीच मी कुणाला तरी सांगितलं होत मला काम मागायची लाज वाटत नाही. आमचं हे खानदानीच आहे. माझी आई राष्ट्रीय पारितोषिक विजेती अभिनेत्री आहे. तिचं सांगणं असतं की काम करतो तो म्हातारा होत नाही.