नवी दिल्ली । भारताचा अव्वल भालाफेकपटू नीरज चोप्रा डायमंड लीग चॅम्पियनशिपमध्ये दुस़र्यांदा सहभागी होणार आहे. शुक्रवारपासून ही स्पर्धा मोनॅकोमध्ये होणार आहे. पुढील महिन्यात लंडनमध्ये जागतिक स्पर्धा होणार असून, नीरजला त्याची पूर्वतयारी डायमंड लीगमध्ये आजमावून पाहता येणार आहे.2 जुलै रोजी पॅरिसमध्ये झालेल्या डायमंड लीगच्या पहिल्या टप्प्यातील स्पर्धेत नीरजने 84.67 मी. भालाफेक करीत पाचवे स्थान मिळवले होते. त्यानंतर भुवनेश्वर येथे नुकत्याच झालेल्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये त्याने सुवर्णपदकाची कमाई केली.
जागतिक स्पर्धेत विक्रम
गेल्या जूनमध्ये पतियाळा येथे झालेल्या फेडरेशन चषक राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण मिळविताना त्याने 85.63 मी. भालाफेक केली होती आणि हीच त्याची या मोसमातील सर्वोत्तम कामगिरी होती. या कामगिरीमुळे त्याला आयएएएफच्या मानांकनात 12 व्या क्रमांकावर झेप घेता आली. मात्र 86.48 मी. ही त्याची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी आहे. गेल्या वर्षी पोलंडमध्ये झालेल्या कनिष्ठ गटाच्या जागतिक ऍथलेटिक्स स्पर्धेत नोंदवलेली त्याची ही कामगिरी स्पर्धाविक्रम करणारी ठरली होती.
कडवे आव्हन
मोनॅकोत त्याची स्पर्धा काही सर्वोत्तम खेळाडूंशी होणार असून त्यात जर्मनीचा जोहानेस क्हेटर, ऑलिम्पिकविजेता थॉमस रोहलर यांचा समावेश आहे. व्हेटरने गेल्याच आठवडयत स्वित्झर्लंडमधील लुसर्न येथे झालेल्य स्पर्धेत त्याने 94.44 मी. भालाफेक करीत सनसनाटी निर्माण केली होती तर 93.90 मी. ही थॉमसची सर्वोत्तम कामगिरी आहे.