नीरज चोप्रा विश्‍व स्पर्धेसाठी पात्र

0

जियाझिंग । ज्युनिअर विश्‍वविजेत्या नीरज चोप्राने आशियाई ग्रांप्री ऍथलेटिक्स स्पर्धेतील दुसर्‍या टप्यात भालाफेकीत रौप्यपदक मिळवत लंडन येथे होणार्‍या विश्‍व ऍथलेटिक्स स्पर्धेची पात्रता गाठली. दुसर्‍या टप्प्यातील या स्पर्धेत गुरुवारी भारताच्या व्ही. नीना हिने लांब उडीत सुवर्णपदक जिंकले.

नीरजने चौथ्या प्रयत्नात आज 83.32 मीटर भाला फेकला आणि लंडनसाठी असलेली 83 मीटरची पात्रता पार केली. पहिल्या टप्प्यात त्याने 82.11 मीटर अंतरावर फेक केली होती. आज पात्रता गाठली असली, तरी नीरजला रौप्यपदकच मिळाले. तैवानच्या चेंग चाओने विजयी मालिका कायम ठेवत 86.92 मीटर कामगिरीसह चीनसाठी सुवर्ण आणि नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला.