बीजींग । पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी निरव मोदी याला भारत सरकार टक करू शकले नसले तरी त्याला हाँगकाँग पोलिस अटक करतील, असे चीनने स्ष्ट केले आहे.नीरव मोदीला अटक करण्यासाठी चीनच्या हाँगकाँग प्रशासनाला विनंती करण्यात आल्याचं परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.के. सिंग यांनी गेल्याच आठवड्यात संसदेत स्पष्ट केले होते. त्यावर बोलताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी ही माहिती दिली. ’चीनमधील मुलभूत कायदे हे हाँगकाँग विशेष प्रशासनिक क्षेत्राच्या अंतर्गत येतात. त्यांच्याकडेच इतर देशाशी न्यायिक आणि परस्पर सहकार्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.