नील आर्मस्ट्राँगची बॅगची किंमत पोहोचली ४० लाख डॉलरवर

0

१९६९ मध्ये चंद्रावर पहिले पाऊल ठेवणारा नील आर्मस्ट्राँग याने चंद्रावरील दगड गोळा करण्यासाठी वापरलेल्या बॅगची किंमत ४० लाख डॉलरपर्यंत पोहोचली आहे.

२० जुलै रोजी चांद्र मोहिमेचा ४८ वा वर्धापनदिन साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्ताने चंद्रावरील त्या बॅगचा लिलाव होणार आहे. सोथबि यांनी हा लिलाव आयोजिक केलेला आहे. चंद्रावर उतरणारा पहिला माणूस पहिलीच मोहिम चंद्रावरील पहिलेच नमुने अशा स्मृती या बॅगशी जोडलेल्या आहेत. आर्मस्ट्रॉन्गने चंद्रावर उतरून निरनिराळ्या ठिकाणांवरून दगड मातीचे नमुने गोळा केले. ती बॅग अत्यंत काळजीपूर्वक तयार केली होती कारण चंद्राबद्दल काहीच माहिती नव्हती. कदाचित नमुने धोकादायक ठरू शकले असते, अशी भीती होती.

अपोलो ११ हे यान पृथ्वीवर परतले. त्यानंतर त्यातील सर्व उपकरणे आणि वस्तू स्मिथ्सोनियन या जगातील सर्वात मोठ्या वस्तुसंग्रहालयात पाठविण्यात आल्या. मात्र आर्मस्ट्राँगची ही बॅग जॉन्सन स्पेस सेंटरमध्येच चुकून राहीली. तेथील कर्मचारी ती फेकणार होते पण नंतर ती कानस म्युझियमच्या प्रमुखाने लपवली. एफबीआयच्या छाप्यातुन ती एका वकिलाकडे गेली आणि वकिलांनी ती नासाकडे दिली. नासाने बॅगमधील मातीचे कण चंद्रावरचे असल्याचे सांगितले. बॅगची मालकी कुणाची यावर वाद न्यायालयात गेला. न्यायालयाने वकीलांच्या बाजुने निर्णय दिला आणि ती बॅग वकील आता लिलावासाठी देत आहे