पुणे । मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) यांच्यातर्फे एमएसएलटीए केपीआयटी अरुण वाकणकर यांच्या स्मरणार्थ अरुण वाकणकर स्मृती एटीएफ आशिया 14 वर्षांखालील टेनिस स्पर्धेत नील जोगळेकर, पर्श परमार, अर्णव पापरकर, अननमय उपाध्याय, जोशुआ इपन अन्या जेकब, आदिती लाखे, सिया देशमुख यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत पात्रता लढतीच्या दुसर्या फेरीत प्रवेश केला. म्हाळुंगे बालेवाडी येथील एमएसएलटीए स्कूल ऑफ टेनिस येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात पहिल्या पात्रता फेरीत नील जोगळेकरने स्वरमन्यू सिंगचा 6-4, 6-1 असा तर पर्श परमारने वेद पवारचा 6-3, 7-5 असा पराभव करत पात्रतालढतीतील दुसर्या फेरीत स्थान मिळवले. मुलींच्या गटात अन्या जेकबने श्रीहिता जलीगामा हीचा 6-3, 4-6, 6-2 असा तीन सेटमध्ये पराभव केला. आदिती लाखेने सिद्धी खोतचा 7-5, 6-1 असा तर सिया देशमुखने सलोनी परिधाचा 6-1, 6-1 असा पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली. 6-1, सिया देशमुख (भारत) वि.वि.सलोनी परिधा (भारत) 6-1, 6-1.
स्पर्धेचा सविस्तर निकाल
पहिली पात्रता फेरी
मुले : नील जोगळेकर(भारत) वि.वि. स्वरमन्यू सिंग (भारत) 6-4, 6-1, पर्श परमार (भारत) वि. वि.वेद पवार (भारत) 6-3, 7-5, अर्णव पापरकर (भारत) वि.वि.अंकित भतेजा (भारत) 6-3, 6-0, अननमय उपाध्याय (भारत) वि.वि.वेदांत भोसले (भारत) 6-1, 6-0, जोशुआ इपन (भारत) वि.वि.सर्वेश झंवर (भारत) 6-1, 6-0.
मुली: अन्या जेकब (भारत) वि.वि.श्रीहिता जलीगामा (भारत) 6-3, 4-6, 6-2, आदिती लाखे (भारत) वि.वि.सिद्धी खोत (भारत) 7-5,