रावेर । जून महिन्यात चार वेगवेगळ्या दिवशी झालेल्या वादळी पावसाने तालुक्यातील केळी पीक आणि अन्य मालमत्तेचे मिळून सुमारे 12 कोटींपेक्षा जास्त नुकसान झालेले आहे. या सर्व नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी महसूल कृषी विभागाने मेहनत घेतली. मात्र, नुकसानग्रस्तांना अद्यापही भरपाईसाठी हालचाली नाहीत. दरवर्षी पावसाळ्याला सुरुवात होताच रावेर तालुक्याला वादळ, गारपिट अथवा वादळी पावसाचा तडाखा बसतो. यंदादेखील ही आपत्ती ओढवली. त्यात प्रामुख्याने कापणीवर आलेल्या केळीचे 12 कोटी रुपयांपेक्षा जास्तीचे नुकसान झाले आहे.